Nagar Crime | नगरमध्ये दुचाकीच्या डिक्कीतून ५ लाख ६० हजाराची रक्कम चोरीला
नगर : दर्शक ।
कृषी विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने त्याच्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली ५ लाख ६० हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना शुक्रवारी दुपारी लालटाकी परिसरात महादेव मंदिराजवळ घडली. या प्रकरणी अशोक एकनाथ दहिफळे (वय ६३, रा. पंकज कॉलनी, समतानगर, नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दहिफळे यांचे पेन्शन त्यांच्या स्टेट बँकेच्या जीपीओ चौक या शाखेत जमा होते . शुक्रवारी सकाळी ११ वाजता ते बँकेत पैसे आणण्यासाठी गेले होते. त्यांनी चेकद्वारे ५.६० लाख रुपये काढले. रोख रकमेसह चेकबुक व इतर कागदपत्रे त्यांनी त्यांच्या दुचाकीच्या (एमएच १६ बीएल ३८२४) डिक्कीत ठेवली.
तेथून कोठलामार्गे ते लालटाकी येथील महादेव मंदिराजवळ आले. दुचाकी लावून ते रस्त्याच्या पलीकडे लघुशंकेसाठी गेले. परत आल्यावर चहा स्टॉलवर चहा घेऊन ते निघाले असता त्यांना गाडीच्या सीटचे रबर निघालेले दिसले. त्यांनी डिक्की उघडून पहिले असता पैसे व कागदपत्रे आढळून आली नाही. त्यानंतर त्यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. अधिक तपास पोलिस करत आहेत.

إرسال تعليق
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com