Health Camp Dehre | चांगले आरोग्य व स्वस्थ परिवार हा कुटुंबाचा कणा आहे - विठ्ठल काळे

 Health Camp Dehre | चांगले आरोग्य व स्वस्थ परिवार हा कुटुंबाचा कणा आहे - विठ्ठल काळे

Health Camp Dehre | चांगले आरोग्य व स्वस्थ परिवार हा कुटुंबाचा कणा आहे - विठ्ठल काळे





 Health Camp Dehre | नगर : दर्शक । 

 महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार घेतले पाहिजे. कोणत्याही गंभीर आजाराकडे दुर्लक्ष न करता योग्य त्या उपचाराने त्यावर मात करावी. कारण चांगले आरोग्य असल्यास आपल्या कुटुंबाबरोबरच समाजाची व त्याचबरोबर देशाची प्रगती होत असते. चांगले आरोग्य व स्वस्थ परिवार हाच कुटुंबाचा कणा आहे असे प्रतिपादन नगर तालुका पंचायत समितीचे माजी सदस्य विठ्ठल काळे यांनी केले.




     प्राथमिक आरोग्य केंद्र देहरे येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार या महिला व बालकांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन विठ्ठल काळे यांच्या हस्ते करण्यात आले.




     स्वस्थ नारी सशक्त परिवार या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार देशभरात आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिरे राबवले जात आहे.मोफत आरोग्य शिबिरे व शासनाच्या आरोग्य योजनांचा सर्व नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ राजेंद्र कसबे यांनी केले.




     यावेळी तंटामुक्तीचे अध्यक्ष विठ्ठल पठारे, देहरे ग्रामपंचायतचे सरपंच किरण लांडगे, युवा नेते महेश काळे, ग्रामपंचायत सदस्य रमेश काळे, अर्जुन लांडगे, इरिगेशन विभागाचे अमोल काळे, युवा नेते सुरज धनवटे, किशोर पठारे, प्रदीप करंडे, माजी उपसरपंच अनिल करंडे, संतोष चोर, आप्पासाहेब पिंपळे,



 अ‍ॅड. वाघ सर, हरिभाऊ तोडमल, माजी उपसरपंच भानुदास भगत,  ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब बडे, माजी चेअरमन अर्जुन काळे, युवा नेते बापू चोर, तसेच डॉ विठ्ठलराव विखे पाटील मेमोरियल फाउंडेशन हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मोरे व त्यांची टीम व सर्व आशा सेविका, आरोग्य कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.




     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डोरले यांनी केले तर आभार पराग चितांबर यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या