Kedgao School Navratri | दक्ले प्री-प्रायमरी स्कूलमध्ये नवरात्र उत्सवात रंगारंग कार्यक्रम उत्साहात पार

 Kedgao  School Navratri |  नवरात्र उत्सवात लहानग्यांच्या बहारदार कलासादरी करणाने प्रेक्षक मंत्रमुग्ध

Kedgao  School Navratri |  दक्ले प्री-प्रायमरी स्कूलमध्ये नवरात्र उत्सवात रंगारंग कार्यक्रम उत्साहात पार




Kedgao  School Navratri |  नगर : दर्शक । 

केडगाव येथील द क्ले प्री-प्रायमरी स्कूल मध्ये नवरात्र उत्सवानिमित्त भव्य व रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला.



     या वेळी शाळेच्या संचालिका सौ. सुजाता पठारे यांचे उत्तम मार्गदर्शन, तर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. नम्रता भंडारी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.


      लहानग्या विद्यार्थ्यांनी विविध स्तोत्रे व श्लोकांचे सादरीकरण करून पालकांची मने जिंकली. परंपरेचा वारसा जपत विद्यार्थ्यांनी चे कन्यापूजन करून ‘सरस्वती वंदना’ केली.



     आजच्या काळातील मोबाईल व टीव्हीच्या दुष्परिणामांवर आधारित “नो मोबाईल फोन, एस टू टॉयज” हे नाटक सादर करण्यात आले. या नाटकांमधून मुलांना व समाजाला प्रभावी संदेश देण्यात आला . 




नाट्यप्रयोगाच्या यशस्वी सादरीकरणासाठी शाळेच्या शिक्षिका सौ. दिपाली पाथरकर यांचे विशेष नाट्य सादरीकरण, व बाकी शिक्षिका तुप्ती लोढा, राधिका कलंबदाने, सजेरी पोळ यांच्या मदतीने नाट्य पार पडले.




    या कार्यक्रमाला माऊली शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री. अभिजित पठारे तसेच उद्योजक श्री. सागर भंडारी उपस्थित होते. शेवटी सौ. दिपाली पाथरकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.




      विशेष म्हणजे, द क्ले प्री-प्रायमरी स्कूल ही सीबीएसई शाळा असून, इंग्रजी शिक्षणाबरोबर सांस्कृतिक वारसा जपत प्रत्येक कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडत पालकांची मने जिंकत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या