Khisti Samaj Nagar | नगर येथे ख्रिस्ती साहित्य संघाची स्थापना

 Khisti Samaj Nagar | नगर येथे ख्रिस्ती साहित्य संघाची स्थापना

Khisti Samaj Nagar | नगर येथे ख्रिस्ती साहित्य संघाची स्थापना


 


नगर - मराठी ख्रिस्ती साहित्य परिषद आणि उपदेशक यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्या नगर येथे, अहिल्या नगर ख्रिस्ती साहित्य संघाची स्थापना करण्यात आली.
      


अहिल्यानगर येथे ख्रिस्ती साहित्य चळवळ वाढीस लागावी या हेतूने हा साहित्य संघ काम करेल असे मराठी ख्रिस्ती साहित्य परिषदेचे अध्यक्ष पौलस वाघमारे यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले. 


        यावेळी उपदेशकचे संस्थापक विक्रम गायकवाड,  मराठी मिशनच्या अध्यक्षा विजया जाधव, कवयित्री सरोज आल्हाट, ज्येष्ठ साहित्यिक प्रा सुजाता लोंढे, ख्रिस्ती साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष आशिष शिंदे, ॲड विनायक पंडित, 


रेव्ह ॲड देवदत्त कसोटे नरेश चव्हाण यांच्या सह अनेक साहित्यिक आणि साहित्य रसिक उपस्थित होते. लवकरच अहिल्या नगर साहित्य संघाच्या वतीने भव्य कविसंमेलन आयोजित करण्यात येईल अशी घोषणा उपदेशकचे संस्थापक विक्रम गायकवाड यांनी केली.
x

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या