जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जिल्हा उद्योग मित्र समितीच्या कामाचा घेतला आढावा
नगर - जिल्हा उद्योग मित्र समितीच्या कामाचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत घेतला.
बैठकीस महाव्यवस्थापक दीपक शिवदास, औद्योगिक विकास महामंडळाचे विभागीय अधिकारी गणेश राठोड, व्यवस्थापक श्याम बिराजदार, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी यांच्यासह अशासकीय सदस्य व संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया म्हणाले, औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांना आवश्यक त्या सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. औद्योगिक क्षेत्रासह शहरालगत असलेल्या ग्रामपंचायतीमधील कचऱ्यासाठी स्वतंत्र डंपिंग यार्ड निर्माण करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
औद्योगिक क्षेत्रात असलेल्या फीडरची आवश्यकते प्रमाणे दुरुस्ती करत या भागात अखंडपणे वीज पुरवठा सुरू राहावा, तसेच पाणी पुरवठाही सुरळीत राहण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात. बोल्हेगाव रस्ता दुरुस्ती, सनफार्मा ते निंबळक रस्ता दुरुस्ती या बरोबरीने औद्योगिक क्षेत्रातील उर्वरित अतिक्रमणे तातडीने हटविण्याची सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी यावेळी दिल्या.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com