Nagar Crime News : इंजिनिअरिंग विद्यार्थ्यावर चार जणांचा हल्ला, पोलिसांकडून तपास सुरू
नगर : दर्शक ।
एका २२ वर्षीय मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना १५ ऑक्टोबर रोजी रात्री भिस्तबाग पडक्या महालाजवळ घडली. या प्रकरणी बालाजी प्रकाश श्रीगादी (रा. लक्ष्मी टॉवर कॉलनी, तपोवन रोड) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून शेरॉन सुरेश पंडीत, अॅलेक्स उर्फ जॉय नितीन सोनवणे (दोघे रा. डॉन बॉस्को कॉलनी), धीरज उर्फ जॅकी जॉन आवारी (रा. गणेश चौक, बोल्हेगाव फाटा) आणि एका अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बालाजी श्रीगादी हे आपल्या (एमएच १२ एमजी ०१२८) क्रमांकाच्या दुचाकीची सर्व्हिसिंग करून घरी परतत असताना, पाठीमागून आलेल्या चार जणांच्या गाडीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यातील एकाने शिवीगाळ करत मारहाण केली. इतर तिघेही आले आणि त्यांनी रस्त्यावरचे दगडे मारली. यावेळी आरोपींपैकी एका युवकाने हातात असलेला लोखंडी कोयता दाखवत तुला मारून टाकूअशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
शहराच्या मध्यवर्ती आणि वर्दळीच्या ठिकाणी कोयत्यासारख्या धोकादायक हत्यारासह हल्ला केल्याने सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com