Pharmacist Day Nagar | विश्वभारती अॅकॅडमीच्या औषध निर्माण महाविद्यालयात जागतिक फार्मासिस्ट दिन उत्साहात साजरा
नगर : दर्शक |
विश्वभारती अॅकॅडमीचे औषध निर्माण महाविद्यालयात जागतिक फार्मासिस्ट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाच्या परिसरात औषधी झाडे लावून करण्यात आली. विद्यार्थ्यांनी उत्साहात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अधिष्ठाता प्रा. साखरवाडे मॅडम होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून अॅकॅडमीचे रजिस्ट्रार गोडगे, डॉ. गणेश जानवे उपस्थित होते. औषध निर्माण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश शेरकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक करताना डॉ. महेश शेरकर यांनी औषधनिर्मिती क्षेत्रातील संशोधन, गुणवत्ता आणि समाजसेवेत फार्मासिस्टची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली. फार्मासिस्ट हा रुग्ण आणि औषध यामधील दुवा आहे. समाजाच्या आरोग्य व्यवस्थेत त्यांचे स्थान मध्यवर्ती आहे, असे ते म्हणाले.
डॉ. गणेश जाणुळे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात डी. एस. ए. सिंथेसिसमध्ये फार्मासिस्टला प्रचंड संधी उपलब्ध आहेत. आधुनिक औषध संशोधनात फार्मासिस्टचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे, असे सांगितले.
अध्यक्षीय भाषणात प्रा. साखरवाडे म्हणाल्या, कोविड-19 सारख्या कठीण परिस्थितीत फार्मासिस्ट समाजासाठी पहिल्या रांगेत उभे राहिले. औषधांच्या उपलब्धतेपासून जनजागृतीपर्यंत त्यांनी केलेली सेवा अमूल्य आहे, असे मत व्यक्त केले.
विद्यार्थी प्रतिनिधी दीपक कोरके आणि तुलसी दायमा यांनी फार्मसी क्षेत्रातील करिअर संधी, समाजसेवा आणि वैद्यकीय क्षेत्रातील जबाबदार्या यावर आपले विचार मांडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गौरी ढमाले यांनी केले तर उपस्थितांनी जागतिक फार्मासिस्ट दिनाच्या उपक्रमाचे कौतुक केले.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com