"कल्पकतेतून निर्माण होणारा भारत” महाराष्ट्रातील स्वतंत्र संशोधकाने दाखल केली

१० पेटंट्स, नवोन्मेषासाठी राज्यस्तरीय मंचाची अपेक्षा

"कल्पकतेतून निर्माण होणारा भारत” महाराष्ट्रातील स्वतंत्र संशोधकाने दाखल केली



नगर - पुणे व नगर जिल्ह्यातील स्वतंत्र संशोधक प्रमोद एस. जाधव यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, गणित आणि ऊर्जा क्षेत्रात तब्बल दहा पेटंट्स दाखल करून महाराष्ट्राच्या नवोन्मेष परंपरेला नवा आयाम दिला आहे. त्यांच्या संशोधनाचे उद्दिष्ट केवळ तांत्रिक प्रगती नसून सामान्य माणसाच्या जीवनात प्रत्यक्ष बदल घडवणे हे आहे.


“माझे संशोधन हे एका शेतकऱ्याच्या समस्येसाठी, एका रुग्णाच्या उपचारासाठी आणि एका विद्यार्थ्याच्या स्वप्नासाठी आहे,” असे जाधव यांनी सांगितले.


संशोधनांचा समाजातील उपयोग
जाधव यांच्या पेटंट्समधून निर्माण होणारे तंत्रज्ञान विविध क्षेत्रात उपयुक्त ठरू शकते कृषी क्षेत्रात हवामान, पाणी व पीक माहिती कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने अचूक मिळवता येईल, ज्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान कमी होईल.
ऊर्जा क्षेत्रात ‘प्रतीकात्मक ऊर्जा बॅटरी’ या तंत्रज्ञानामुळे वीज संचय अधिक काळ टिकणारा व ऊर्जा-बचतक्षम होऊ शकतो.शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी प्रतीकात्मक तर्कशास्त्रावर आधारित संगणक प्रणाली विकसित होऊ शकते, जी विचारशक्ती आणि समस्या सोडवण्याची क्षमता वाढवेल.


आरोग्य क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित विश्लेषण प्रणाली रुग्णांच्या अहवालांचे सखोल परीक्षण करून आजारांचे लवकर निदान करण्यास मदत करेल.शासन व उद्योग क्षेत्रात संसाधनांचे योग्य नियोजन व निर्णयप्रक्रिया सुलभ होऊन खर्च आणि वेळ दोन्ही वाचतील.


“निधी नव्हे, विश्वास हवा” ही संशोधकाची भूमिका विशद करताना प्रमोद जाधव म्हणाले,
“भारतामध्ये कल्पनाशक्तीला संधी मिळाली पाहिजे. निधी नको, पण विश्वास हवा. प्रत्येक सृजनशील मनाला प्रोत्साहन दिलं, तर भारत जगात नवोन्मेषाचा नेता बनेल.”त्यांनी महाराष्ट्र शासनाकडे विनंती केली आहे की स्वतंत्र संशोधक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी एक ‘नवकल्पना अंमलबजावणी मंच’ तयार करण्यात यावा, ज्याद्वारे संशोधन समाजाच्या सेवेसाठी थेट वापरता येईल.असे नमुद केले.


 २०२५ मधील काही महत्त्वाची पेटंट्स ग्राफ रंगसंगती आणि संसाधन नियोजन पद्धती १८ मार्च २०२५,निश्चित अभाज्य संख्या निर्माण प्रणाली २ एप्रिल २०२५,एन्ट्रो-टोपॉलॉजिकल प्रतीक बीजगणित (ईटीएसए) २८ एप्रिल २०२५,निश्चित क्रमांतर निर्देशांक प्रणाली (डीपीआयई)  ३ जून २०२५, क्वांटम संभाव्यता आधारित प्रतिमा संकुचन प्रणाली ३ जून २०२५, प्रतीकात्मक टेन्सर रचना भाषा (एसटीडीएल) १७ जून २०२५,प्रतीक स्फटिकीकरण आणि तर्क-ऊर्जा बॅटरी १८ ऑगस्ट २०२५, प्रतीकात्मक तर्कशास्त्र क्षेत्र प्रणाली (एसएलएफएस)  १२ सप्टेंबर २०२५, डीपीआयई विस्तारित दावे ३ जून २०२५,(नवीन संशोधन प्रलंबित) असे आहे.


संपर्क माहिती प्रमोद एस. जाधव स्वतंत्र संशोधक आणि शोधकर्ता इमेल jadhav.009@gmail.com दूरध्वनी ९२७२०७९८६९ / ८३२९३९४१२५ यांना करावे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या