Nagar Sports | गार्गी रुपेश चव्हाणने आर्चरी मध्ये २ पदके मिळवून राष्ट्रीय स्पर्धेत निवड
Nagar Sports | नगर : दर्शक ।
नुकतीच अमरावती येथे 19 /20डिसेंबर 2025 रोजी शालेय राज्यस्तरीय आर्चरी स्पर्धेत संपन्न झाली यामध्ये नगरची गार्गी रुपेश चव्हाण हिने 1 कांस्य व 1 रजत पदक पटकावत राष्ट्रीय स्पर्धेत तिची निवड झाली
क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे,अंतर्गत उपसंचालक क्रीडा व युवक सेवा अमरावती विभाग,जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा कार्यालय तसेच महाराष्ट्र आर्चरी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या क्रीडा स्पर्धा नुकतीच संपन्न झाली.
यामध्ये नगरची रहिवासी व सध्या इ.12 वी मध्ये दादासाहेब घाडगे पाटील विद्यालय इथे शिक्षण घेत असलेली गार्गी चव्हाण हिने २ पदकाची कमाई करून इंफाळ, मणिपूर राज्य येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघात स्थान पटकावले
लहान पणापासून तिला क्रीडा क्षेत्राची आवड असून आजपर्यंत तिला अनेक राष्ट्रीय व राज्य स्तरावर पदके मिळवली असून राज्य मिनी ऑलंपिक मध्ये सुवर्ण पदक मिळवले आहे. तिला नगरचे अभिजित व शुभांगी दळवी याचे कडे प्रशिक्षण घेत आहे व त्यांचे मार्गदर्शन आहे

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com