Samarth School | समर्थ प्रशालेत विविध स्पर्धातील कलाकारांचा सत्कार संपन्न
Samarth School | नगर : दर्शक ।
ढोल ताशांच्या गजर,डोक्याला बांधलेल्या गुलाबी फेटाच्या रंगांमध्ये हरखलेली मुले,भले मोठे मानपत्र,मुलांच्या उंचीएवढा करंडक,चमकीच्या कागदात लपेटलेले बक्षीस अन हातात फुलणारे गुलाब पाहून खुलणारे बाल नाट्यकलाकार, पाठीवर शाबासकीची थाप ठेवणारे पाहुण्यांचे हात आणि पाया पडणारी गोड मुले ....असे चित्र होते सावेडीच्या समर्थ प्रशालेच्या वतीने आयोजित विविध स्पर्धांतील पारितोषिक प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे.
सावेडीच्या श्री समर्थ विद्यामंदिर प्रशालेच्या वतीने कथाकथन,नाट्य दिग्दर्शन,नाट्यसंहितालेखन,अभि नय नेपथ्य आदी विविध स्पर्धातील प्राथमिक व माध्यमिक विभागातील गुणवत्ता प्राप्त विजेत्यांच्या कौतुक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष दीपक ओहोळ, चेअरमन विकास सोनटक्के,कार्यकारिणी सदस्य तथा शालेय समिती चेअरमन ॲड किशोर देशपांडे, संध्या कुलकर्णी ,रागिनी ओहोळ,मुख्याध्यापिका धनश्री गुंफेकर ,पर्यवेक्षक लक्ष्मीकांत कुलकर्णी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. मान्यवरांच्या शुभहस्ते समर्थपूजनसंपन्न झाल्यानंतर प्राचार्या वसुधा जोशी यांनी प्रास्ताविक केले.
बालपणापासूनच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वातील कलागुण ओळखून त्यांना योग्य तो सराव देऊन व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि त्यातून त्यांना पारितोषिकाची प्राप्ती होणे असा सुंदर शैक्षणिक प्रवास म्हणजेच व्यक्तिमत्व विकास होय.स्वतःमध्ये कोणकोणत्या कला आहेत हे ओळखून त्यानुसार आचरण करणे म्हणजेच या शिक्षण यात्रेचा प्रवासी कलाकार होय.विविध कला स्पर्धांमध्ये उत्तुंग यश मिळवलेले विद्यार्थी मानाच्या फेटाच्या सत्कारासाठी निश्चितच पात्र आहेत.कारण अत्यंत कष्टातून त्यांनी हा सत्काराचा मानाचा फेटा प्राप्त केलेला आहे.असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड किशोर देशपांडे यांनी केले.
संस्थेचे उत्तरदिशेचा बागुलबुवा" हे गाजलेले नाटक महाराष्ट्र शासनाच्या राज्य बालनाट्य स्पर्धा, ऊर्जा रंगभवन, येथील सादरीकरणाबरोबरच सकाळ एनआयई बालनाट्य स्पर्धा विजेतेपद,शारदा कथाकथन करंडक,
तसेच राज्य बालनाट्य स्पर्धेतील विजेते तसेच निर्माती-दिग्दर्शिका आरती अकोलकर,नेपथ्य सजावटकार दीपक अकोलकर,मार्गदर्शक शिक्षक डॉ.अमोल बागुल,वृषाली कुलकर्णी ,प्रियांका कासार यांचा सत्कार मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला.
समर्थ सभागृहात संपन्न झालेल्या या सत्कार सोहळ्यासाठी शिक्षक, पालक ,विद्यार्थी तसेच अनेक नाट्यप्रेमी उपस्थित होते.
.webp)
إرسال تعليق
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com