Top News

Eye Camp Nagar | मोफत नेत्रतपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद ; २५० रुग्णांची तपासणी ७० मोफत ऑपरेशन

 Eye Camp Nagar |  मोफत नेत्रतपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; २५० रुग्णांची तपासणी, ७० जणांचे मोफत मोतीबिंदू ऑपरेशन

Eye Camp Nagar | मोफत नेत्रतपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद ; २५० रुग्णांची तपासणी ७० मोफत ऑपरेशन


एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालयाच्या पुढाकारातून सेवा; शिबिरांविषयीची भीती दूर होत असल्याचे डॉ. आनंद किशोर बोज्जा यांचे मत

नगर —
शहरातील दिल्ली गेट परिसरात आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्रतपासणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शमी गणपती मंदिरासमोर, कानूर पठार पतसंस्था येथे सुरू असलेल्या या शिबिरात एकूण २५० रुग्णांची डोळ्यांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ७० रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी मोफत निवड करण्यात आली आहे.





          पुणे येथील एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालयाच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडत असून, डॉ. आनंद किशोर बोज्जा (नेत्रचिकित्सक) यांनी स्वतः रुग्णांची तपासणी करून त्यांना योग्य उपचाराबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना डॉ. बोज्जा म्हणाले की, पूर्वी मोफत शिबिरांबाबत लोकांमध्ये शंका आणि भीती होती. शस्त्रक्रिया योग्य होणार नाही, अशी भावना अनेकांच्या मनात होती. मात्र आज अत्याधुनिक तंत्रज्ञान, अनुभवी डॉक्टर आणि सेवा-भावी संस्थांच्या योगदानामुळे ही भीती दूर होत असून, अशा शिबिरांमुळे हजारो रुग्णांना नवदृष्टी मिळत आहे.



       या शिबिराच्या माध्यमातून शहरासह उपनगर व ग्रामीण भागातील नागरिकांनाही मोठा लाभ होत असल्याचे दिसून आले. अनेक ज्येष्ठ नागरिकांनी तपासणी करून घेतली असून, मोतीबिंदूचे निदान झालेल्या रुग्णांना मोफत शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनाही गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा मिळत असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.



        या उपक्रमात रोटरी क्लब ऑफ नगर (आदेशा) चे नितीन थाडे यांचे सहकार्य लाभले. तसेच वेदांत व्यंकटेश बोमादंडी यांनी शिबिराचे नियोजन, समन्वय व रुग्ण व्यवस्थापनाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. त्यांच्या प्रयत्नांमुळे शिबिर सुरळीत पार पडत असून रुग्णांकडूनही समाधान व्यक्त केले जात आहे.




मोफत आरोग्य सेवा तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हे शिबिर सोमवार ते शनिवार सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत सुरू असून, अधिकाधिक नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक  माहितीसाठी वेदांत व्यंकटेश बोमादंडी (संपर्क : ७७५७८१५९८९ / ०२०-२६९७४१०९) यांच्याशी संपर्क साधावा.

Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

أحدث أقدم