Top News

Ahmednagar Sports: खेळांच्या माध्यमातून युवक भक्कम स्थान निर्माण करु शकतो - आ.संग्राम जगताप

 Ahmednagar Sports: महापद्मसेना आयोजित ‘अखंड पद्मशाली चषक 2023’ चे आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते शुभारंभ




Ahmednagar Sports: अहमदनगर (प्रतिनिधी)  -   समाजमध्ये महापद्मसेना मोठ्या उत्साहने काम करत आहे. समाजातील तरुण युवकांना नोकरी बरोबरच मैदानी खेळाकडे वळावे म्हणुन भव्य टेनिस बॉल क्रीकेट स्पर्धा भरवुन एक चांगली कामगिरी केली आहे. आज स्पर्धेच्या युगामध्ये नोकरी मिळणे फार कठीण झाले आहे.  खेळांच्या माध्यमातून तो आपली कामगिरी दाखवुन एक भक्कम स्थान निर्माण करु शकतो. महापद्मसेनेने एक चांगल व्यासपीठ तरुणांना मिळवुन दिले आहे, असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले. 


नगर शहरामध्ये महापद्मसेना आयोजित ‘अखंड पद्मशाली चषक 2023’ भव्य टेनिस बॉल क्रिकट स्पर्धेचे  वाडिया पार्क, नगर येथे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते  पहिला सामना लावुन शुभारंभ करण्यात आला.  यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक मनोजभाऊ दुलम, श्रीनिवास बोज्जा, अ‍ॅड. धनंजय जाधव, किशार डागवाले, अंजलीताई वल्लाकट्टी,  त्रिलेश येनगंदुल, संजु मंचे, दत्तात्रय रासकोंडा, विनायक मच्चा, नारायण कोडम, श्रीकांत मंडाल, प्रमोद गुंडू, गोपाल न्यालपेल्ली, गिरीश चिट्टा, अमित बुरा, प्रकाश कोटा, रुपाली बोडखे,  डॉ.रत्ना बल्लाळ, शरद क्यादर, कुमार आडेप, ज्ञानेश्‍वर मंगलारप, संजय वल्लाकट्टी, सागर मुर्तडकर, संदिप दातरंगे, दिपक आडेप, महेंद्र कवडे, नारायण मंगलारप, श्रीनिवास येल्लाराम, परेश खराडे, विनोद म्याना, सुभाष वल्लाकट्टी, श्रीनिवास न्यालपेल्ली आदी उपस्थित होते.  सर्व कार्यकर्ते व समाज बांधव उपस्थित होते. 

यावेळी महापद्मसेनेच्या वतीने सांगण्यात आले कि, तरुणांना योग्य वयात चांगले मार्गदर्शन मिळाले नाहीतर तो वाममार्गी लागतो, म्हणुन समाजातील विविध संघटनांनी एकत्र येवुन असे विविध स्पर्धेचे आयोजन करणे गरजे आहे.  आजच्या व्हाटस्अप व फेसबुकच्या जमाण्यात मैदानी खेळाकडे दुर्लक्ष होत चालले आहे, अशा स्पर्धेच्या आयोजनाने युवकांना एक चांगले आरोग्य मिळेल व युवकांच्या सर्वांगीन प्रगती होईल, याच उद्देशानेच महापद्मसेनेने ही स्पर्धा भरवली आहे.

हि स्पर्धा आयपीएल प्रमाणे घेण्यात येत असून यामध्ये नगरशहरातील व राज्यातील विविध संघ निवडण्यात आले. यामध्ये 1.नित्यसेवा संघ (रवि गुडा), 2 .उपनगरचा राजा (अवि इराबत्तीन), 3. अखंड श्रमिकनगर (विनित बुरला), 4.  गोसके आर्टस् (संदिप गोसके), 5. एस.बी.ऑटो (जयंत बोगा), 6. महाकाल वारियर्स (अभिजित यनगंदुल), 7. मंगलगेट सी.सी.( राज नागुल), 8. महामुनी मार्कंडेय भक्त (संजय इरमल, पुणे), 9. श्री प्रतिष्ठान (श्रीनिवास संगा, सोलापुर) 10. पुणे पद्मशाली वारियर्स (राजेश इपलपेल्ली, पुणे) असे या स्पर्धेमध्ये 10 संघांनी प्रवेश घेतला आहे. प्रत्येक संघाचे 4 लिग मॅचेस प्रमाणे हि स्पर्धा एकूण 7 दिवस चालणार आहे. 

7 व्या दिवशी दु.3 वा. अंतिम सामना होणार आहे. या स्पर्धेस नगरसेवक मनोजभाऊ दुलम, रवि दंडी, श्रीनिवास बोज्जा, हॉबी डिझायनर स्टुडिओ त्रिलेश येनगंदुल, लक्ष्मी टाईम्स् संजय मंचे, रेडिन्स हॉटेल दत्तात्रय रासकोंडा, गिरीश चिट्टा, संदीप दातरंगे, गोपाल न्यालपेल्ली, अभिषेक गुंटूक, दीपक आडेप, राहुल ग्राफिक्स शुभम पासकंटी,ओम डिजिटल रमेश आकुबत्तीन व संजय बोगा, गोसके आर्टचे संदीप गोसके, गुंडू मोबाईल बाजार प्रमोद गुंडू, श्री मार्कंडेय नागरी  सहकारी पतसंस्था, चाय मस्काचे रोहित कोडम, श्री ज्वेलर्सचे श्रीकांत मंडाल, रिधिका ग्राफिक्स चेतन नागुल, शाडो फोटोचे गोविंदा नामन यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. 

तरी क्रीकेट प्रेमींनी हे सामने पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महापद्मसेनेच्या वतीने करण्यात आले आहे. हि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी   शंकर जिंदम, अमोल येनगंदुल, रवि दंडी, विनोद बोगा, रोहिदास बुरम, राजेंद्र इगे, उदय सुरम, विनोद बुरा, किरण वल्लाकट्टी, विनीत बुरला, अमित बिल्ला, अमोल बिज्जा, संजय बोगा, रमेश गाजुल, प्रविण शिरापुरी, दर्शन येमुल, गोविंद नामन, दिपक बुरला, निलेश गंगुल, प्रविण बुरा, अभिजीत येनगंदुल, गोपाल न्यालपेल्ली,  रोहन गुंडू, गितेश सादुल, अक्षय दुस्सा, रोहित अलवाल, राज नागुल, आनंद येनगंदुल, प्रणव बोगा, रमेश आकुबत्तीन, पंकज धेंड, अक्षय संभार, शुभम अंकारम, प्रथमेश बोगा, गणेश इपलपेल्ली, विष्णु रायपेल्ली, विक्रांत ताडला आदि विशेष परिश्रम घेत आहेत.

Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

أحدث أقدم