अहमदनगर (प्रतिनिधी) : संविधानविरोधी, लोकशाहीविरोधी सत्ताधारी घटकांकडून देशात सुरू असलेल्या वाईट परिस्थिती विरूध्द लढण्यासाठी राज्यभरात सुरू असलेल्या ''निर्भय बनों' चळवळीचा एक भाग म्हणून अहमदनगर शहरातील टीम निर्भय बनोच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त मुक्त संवादाचा 'भगतसिंह कट्टा' या उपक्रमाचा आरंभ करण्यात आला.
प्रारंभी तरूणाईचे आदर्श असलेल्या छत्रपती संभाजी महाराज व शहीद भगतसिंह यांच्या प्रतिमेस संध्या मेढे व सुनंदा कोडम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी शहीद भगतसिंह आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा जयघोष केला.
'भगतसिंह कट्टा' या उपक्रमाचे प्रा. महेबूब सय्यद यांनी प्रास्ताविक केले. त्यामध्ये ते म्हणाले, " भारतीय राज्यघटनेने सर्व भारतीयांना स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय यावर आधारित लोकशाही दिलेली आहे. ही लोकशाही कायम राहावी म्हणून निर्भय बनो ही चळवळ उभी राहिली आहे. आपल्यातील मतभेद कायम ठेवूनही लोकशाही रक्षणासाठी आणि धर्मनिरपेक्षतेसाठी आपण एकत्र आलेलो आहोत. हे ध्यानात घेऊन काम करावे. यापुढे प्रत्येक रविवारी सकाळी दहा वाजता शहीद भगतसिंग स्मारकाजवळ आपण जमुया, त्यावेळी अहमदनगर शहरातील विविध प्रश्नांवर चर्चा करूया."
आनंद शितोळे यांनी प्रारंभी संवाद सुरू करताना सांगितले की, गांधीजींनी सगळ्या चळवळी लोकांचे आर्थिक प्रश्न, रोजगाराचे मुद्दे जोडून घेऊन सुरू केल्या म्हणून लोकांचा प्रतिसाद मिळाला, जास्तीतजास्त लोकांकडून कमीतकमी त्यागाची अपेक्षा हे सूत्र ठेवलं तर चळवळीत जास्तीतजास्त लोक सहभागी होतील, शिक्षण आरोग्य रोजगार व्यवसाय त्यासाठी आवश्यक असणारी शांतता आणि सामाजिक सलोखा या गोष्टी महत्वाच्या मानून तेच मुद्दे घेऊन बिगर भाजप लोकांशी संवाद गरजेचा आहे.
श्रीकांत वंगारी म्हणाले की, स्वातंत्र्यसंग्रामातील थोर नेत्यांविषयी व्हाट्सअप युनिव्हर्सिटीवर ज्या चुकीच्या माहिती पसरवण्याची ती त्या संदर्भात महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, जिना अशा थोर समाजसुधारकांच्या बद्दल सखोल माहिती व चर्चा करून आपल्या कट्ट्यामार्फत कॉलेज, शाळा, कॉलनी, चौक ठिकाण या विषयी वैयक्तिक तरुणांमध्ये प्रबोधन करून त्यांच्याविषयी असलेल्या चुकीचे चित्र बदलण्याचे काम आपण केलं पाहिजे. तसेच स्वातंत्र्यानंतर झालेल्या पाळणे संदर्भात खरी खरी माहिती समाज्यातील १५ ते ३५ वयोगटातील तरुणांपर्यंत पोचून. आपल्या स्वतंत्र संग्रामाचे आणि देवाची परिस्थिती याविषयी प्रबोधन करणे गरजेचे.असे छोटे छोटे प्रयोग करून लोकांपर्यंत पोहोचू संघ आणि भाजप यांच्या कुटील कूटनीतीबद्दल बद्दल आपण तरुणांमध्ये चर्चा घडवून समाजामध्ये परिवर्तन करू शकतो.
महेश घावटे मागील परिस्थितीचा आढावा घेतला म्हणाले की, भा.ज.पा. ला सत्तेत येण्यात ईव्हीएम'चा मोठा वाटा असल्याचे दिसून येते. ज्या राज्यात जनमत विरोधात आहे, जनतेच्या मनांत सरकार विरोधात तीव्र रोष,संताप आहे तरी सुद्धा त्या राज्यामध्ये भाजपाची एकहाती सत्ता येणे म्हणजे कुठंतरी गोम नक्किच आहे. सर्व विकसित देशांमध्ये निवडणूक प्रक्रियेत ईव्हीएम तंत्रज्ञानाला फाटा देऊन लोकशाही मार्गाने बॅलेट पेपरवर मतदान घेतले जाते. शेवटी ईव्हीएम हे एक इलेक्ट्रॉनिक माध्यम आहे आणि त्यात छेडछाड केली जाऊ शकते त्यामुळे येणाऱ्या निकालावर परिणाम होऊन चुकीचे लोक सत्तेत येऊ शकतात, या अनुषंगाने काही महिन्यांपूर्वी बांगलादेशने सुद्धा ईव्हीएम बाद केले आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कदाचित भाजपाने ईव्हीएममध्ये सेटिंग नसेलही केली परंतु त्यांना राज्यांपेक्षा देशात सत्ता महत्वाची आहे. म्हणून लोकसभेला बहुमतासाठी ते ईव्हीएम हॅक करून सत्तेत येतील आणि कुणी ओरड केली की कर्नाटकात का नाही झाले म्हणून ओरड करतील..???
अक्षर मानव'चे जावेदा जिंदगी म्हणाले की, निर्भय बनोच्या माध्यमातून नागरीकांच्या मुलभूत प्रश्नांवर काम करावे. शहरातील प्रत्येक उपनगर किंवा रहिवासी भागात उपक्रम सुरू करावेत. सामान्य नागरिक या चळवळीचा भाग झाला तर निश्चितच आपल्याला लोकशाही आणि संविधानिक मुल्ये रुजवणे सोपे जाईल.
संध्या मेढे यांनी लवकरच 'निर्भय बनों' चे स्टीकर आपल्या वाहनावर लावण्याचे सांगितले आणि लवकरच शाळा, कॉलेजचे विद्यार्थी यांच्यासोबत सामुहिक संवाद साधण्यची मोहिम सुरू करण्याचे कळविले.दत्ताभाऊ वडवणीकर यांनी १८ ते २८ या वयोगटातील तरूणाईचे राजगाराचे प्रश्न आपण सोडविले पाहिजे असे सांगितले.
संजय झिंजे यांनी तरूणाईच्या भरकटलेल्या सामाजिक, आर्थिक व राजकीय परिस्थितीविषयी माहिती देवुन त्यांच्यावर काम करण्याची सुचना केली.श्याम आसावा यांनी निर्भय बनो आणि भगतसिंह कट्टा याचा आढवा घेऊन. काम नक्की कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.भगतसिंह कट्ट्यांचा आरंभ झाला असे जाहीर करून कार्यक्रमाचे आभार भैरवनाथ वाकळे यांनी मानले.
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com