शेवगाव : अहमदनगर जिल्ह्यातील शेवगावमध्ये रविवारी (ता. १४) रात्री दोन गटांत तुफान दगडफेक झाली. यात पोलिस कर्मचार्यांसह चार जण गंभीर जखमी झाले आहेत. अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ३१ जणांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, याच्या निषेधार्थ सोमवारी शेवगाव शहरात बंद पाळण्यात आला.
शेवगावत रविवारी रात्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. ही मिरवणूक मेरी रोड मार्गे शेवगाव शहरातील मुख्य एसटी स्टँड चौकात आली. तिथून पुढे मिरवणूक जात असताना डीजेवरून दोन गटात तुफान राडा झाला. रात्री आठ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार सुरूवातीला एका गटातील एकाने दगड भिरकावला. त्याला प्रत्युत्तर म्हणून दुसर्या गटानेही दगडफेक सुरू केली.
दोन्ही गटांच्या आक्रमकपणामुळे घटनास्थळी नंतर तुफान दगडफेक झाली. यामुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता.दगडफेक सुरू असतानाच पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, यादरम्यान दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले. तसेच, दोन युवकही गंभीर जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी रात्री उशिरा कोम्बिंग ऑपेरेशन राबवून या दंगलीतील संशयित तरुणांना अटक करण्याचे काम हाती घेतले जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्यासह सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी शेवगावात तळ ठोकून आहेत पोलीस अधिक्षक ओला यांनी अफवा पसरवू नये आणि अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com