अहमदनगर (प्रतिनिधी) - राष्ट्रीय चर्मकार महासंघाला कार्य करत आज जवळजवळ 28 वर्ष होत आले आहेत. महासंघाचे कार्य समाज स्वतः डोळ्यांनी पाहत आहे. फक्त सोशल मिडीया, फोटो आणि प्रसिध्दी साठी काम न करता निस्वार्थपणे आणि झोकुन देऊन काम करणार्यांचा ओघ वाढत आहे.
त्यामुळे संघटनेसाठी पोषक असे वातावरण निर्माण होत आहे. आज अहमदनगर जिल्ह्यामध्ये नवीन पदासाठी कार्य करणार्या तरुण आणि होतकरू कार्यकर्त्यांच्या उत्साहावरून हे जाणवत आहे. महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बबनराव घोलप यांच्यावर आणि राष्ट्रीय चर्मकार महासंघावर जो विश्वास समाज दाखवत आहे तो निश्चित गौरवास्पद आहे, असे प्रतिपादन निवड समिती प्रमुख भानुदासजी विसावे यांनी केले.
राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या अहमदनगर दक्षिण जिल्ह्यातील कार्यकर्ता निवडीच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी निवड समिती प्रमुख भानुदासजी विसावे, समिती सदस्य माजी आ. भाऊसाहेब कांबळे, दत्तात्रय गोतिसे, दिलीपराव कानडे, राजेंद्र बुंदेले, शोभाताई कानडे, जयश्रीताई विसावे, भारतीताई बाविस्कर, अनिल कानडे, आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी संत रविदास महाराज प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी माजी आ.भाऊसाहेब कांबळे म्हणाले, चर्मकार समाजासाठी कार्यरत अनेक संघटना असून कोणतीही संघटना राष्ट्रीय चर्मकार महासंघाची बरोबरी करू शकत नाही. कारण की चर्मकार हृदयसम्राट बबनराव घोलप नानांनी जिवापाड मेहनत, कष्ट करून चर्मकार समाजातील अठरापगड जातींना एकत्रित करून एका व्यासपीठावर आणून अराजकीय संघ म्हणून लौकिक मिळवलेला आहे. आणि त्यांना मानणारा आख्खा महाराष्ट्र असल्यामुळे राष्ट्रीय चर्मकार महासंघामध्ये काम करण्यास नेहमीच अनेक जण इच्छुक असतात, असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी दत्तात्रय गोतिसे यांनी महासंघाच्या नवीन धोरणानुसार बळजबरीने पदाचे वाटप न करता पारदर्शी पध्दतीने नियुक्त्यांसाठी अर्ज वाटण्यात आले असून ज्यांची ज्यांनी पदावर काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे अशा सर्व पदाधिकार्यांच्या नियुक्त्या विचारविनिमय करून लवकरच जाहीर करण्यात येतील, असे जाहीर केले.
श्री. राजेंद्र बुंदेले यांनी प्रस्तविकात नुकताच नाशिक मधील घोटी येथे कार्यकर्ता शिबिरामध्ये झालेल्या कार्यक्रमाची माहिती देऊन पुढील काळात संघटना शिस्तबद्ध आणि नि:स्वार्थपणे काम करेल. सर्व पदाधिकारी कार्यकर्ते एकोप्याने एकजुटीने समाजातील अडीअडचणी, अन्याय अत्याचार विरोधात उभे राहून समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतील असा विश्वास व्यक्त केला.
मेळावा यशस्वीतेसाठी कैलास गांगर्डे, बाळासाहेब केदारे, संतोष उदमले, प्रशांत डहाके, विक्की गारदे, कन्हैया बुंदेले आदींनी परिश्रम घेतले. मेळाव्यास संभाजीसेठ आहेर, लताताई नेटके, चंद्रकांत जाधव, विशाल बेलपवार, अभिनव सुर्यवंशी, रघुनाथ आंबेडकर, ज्ञानेश्वर कसाब, राजेंद्र ठोंबरे सर, लक्ष्मण भगवान उदमले, अजिनाथ वाघमारे, विक्रम क्षीरसागर नवनाथ कवडे, विष्णू पाटे, ज्ञानेश्वर म्हैसमाळे, ईश्वर खरात, विद्या कसाब, बाळासाहेब उदमले, मनोहर माने, गणेश उदमले, महेश आहेर, ईश्वर पवार, संजय उदमले, प्रशांत नेटके, रामेश्वर बुंदेले, शुभम सरोणे, सुभाष सिताराम उदमल, दादासाहेब ठवाळ,हिराबाई आहेर, सुरेखा उदमले, पुजा आहेर, सुषमा उदमले, पार्वती उदमले, अप्पासाहेब केदारे, सोमनाथ केदारे, गणेश गोरे, रविंद्र खैरे, अशोक बगळे, संतोष कांबळे आदींसह अहमदनगर दक्षिण जिल्ह्यातील महिला पदाधिकारी, कार्यकर्ते, व समाज बांधव आणि भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते.
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com