अहमदनगर (प्रतिनीधी) -युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या वाढदिवसानिम्मित आज शेंडी ग्रामपंचायत सदस्यच्या वतीने शेंडी येथील खंडोबा माळ रोडवरील भिल्ल वस्तीत किराणा साहित्य वाटप करण्यात आले यावेळी सरपंच प्रयागाताई लोंढे, ग्रा सदस्य दत्ता राऊत, सुनिल देठे ,सागर शिंदे, संतोष त्रिंबके ,उस्मान पठान, श्वेता देठे व इतर मान्यवर अविनाश शिंदे, किशोर शिंदे, राजु भाऊ शिंदे, पप्पू पुंड, बाळू कराळे, मंगेश देठे व ग्रामस्त शेंडी अंगणवाडी सेविका सुलोचना चव्हाण ,संगीता देठे आदी उपस्थित होत्या
सरपंच लोंढे म्हणाल्या अक्षय दादाच्या वाढिवसा निम्मित फ्लेक्स बोर्ड,शुभेछया सभारंभ,केक कटिंग आदी सर्व उपक्रमाला फाटा देत सामाजिक जाणिवेतून गरजूना मदत करावी या उद्धेशाने आम्ही हा उपक्रम राबविला आहे व याचे कौतुक माजी मंत्री शिवाजी कर्डीले व युवा नेते अक्षय कर्डिले यांनी केले आहे व येथून पुढे गावातील कोणाचाही वाढदिवस असला तरी विविध सामाजिक,गरजू संस्थांना मदत करण्यात येणार आहे
दत्ता राऊत यांनी वाढदिवसाच्या अक्षय दादाला शुभेछया देऊन सरपंच प्रयागाताई लोंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून गावात लोकपयोगी उपक्रम राबविले जात आहेत यामध्ये कॉपी मुक्त गाव,महिला मेळावा,बचतगट प्रदर्शन असे अनेक उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत, येथून पुढेही आम्ही असेच उपक्रम राबविणार आहे तसेच या वस्तीला जलजीवन योजनेतून पाणी पुरवठा करणार आहोत ,येथील सर्व लोक गरीब आहेत त्याच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी कायम प्रयत्नशील राहू

إرسال تعليق
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com