अहमदनगर (प्रतिनीधी) - येथील जयश्री भाऊसाहेब भोसले यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून वनस्पतीशास्त्र विषयात डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. जयश्री भोसले यांनी पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र संशोधन केंद्रार्गत डॉ. संजय गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली निवडलेल्या ‘वनस्पतींमधून चांदीच्या नॅनोकणांचे हिरवे संश्लेषण आणि त्यांच्या प्रतिजैविक क्रियांचा अभ्यास करणे’ या विषयावर पीएचडी प्रबंध सादर केला होता.
जयश्री भोसले यांचे चार शोधनिबंध आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रकाशित झाले आहेत. त्यांना पद्मश्री विखे पा. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे, उपप्राचार्य व वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अनिल वाबळे तसेच वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख, सात्रळ महाविद्यालय डॉ. आर. डी. बोरसे, शिर्डी साई रूरल इन्स्टिटयूटचे डायरेक्टर डॉ. महेश खर्डे, प्रा. काकड यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच प्रेरणा जाधव, जोंधळे व स्नेहल धस यांचे सहकार्य लाभले. तसेच यासाठी छत्रपती शाहूमहाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था (सारथी) पुणे यांचे कडून सीएमएसआरएफ-2019 अंतर्गत फेलोशिप मिळाली.
जयश्री भोसले यांच्या या यशाबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

إرسال تعليق
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com