Top News

Dr Vikhe Patil College | डॉ.विखे पाटील अभियांत्रिकीत प्रशिक्षण वर्गांना सुरुवात

 Dr Vikhe Patil College |  डॉ.विखे पाटील अभियांत्रिकी मध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र अंतर्गत विविध व्यावसायिक प्रशिक्षण वर्गांना सुरुवात

Dr Vikhe Patil College |  डॉ.विखे पाटील अभियांत्रिकी मध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र अंतर्गत विविध व्यावसायिक प्रशिक्षण वर्गांना सुरुवात






नगर : दर्शक । विळद घाट येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग  येथे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आणि नाविन्यता मार्गदर्शन केंद्र अंतर्गत आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राच्या वतीने सोलर पॅनल इलेक्ट्रिशियन, अ‍ॅक्टिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, थ्रीडी मीटिंग, इलेक्ट्रॉनिक्स हार्डवेअर असेम्ब्ली आणि ज्युनिअर सॉफ्टवेअर डेव्हलपर या प्रशिक्षण वर्गांसाठी मान्यता मिळाली आहे.



सदर प्रशिक्षण वर्ग सोमवार दिनांक 21 एप्रिल 2025 पासून सुरू झाले असून प्रत्येक बॅचमध्ये 30 विद्यार्थ्यांची क्षमता आहे.अशी माहिती  प्राचार्य डॉ.उदय नाईक यांनी दिली.


प्रशिक्षण कार्यक्रम 540, 390, 390 आणि 450 तासांच्या कालावधीचे असून त्याचे समन्वयक म्हणून डॉ.अमित लावरे कार्यरत आहेत.


या प्रशिक्षणांद्वारे विद्यार्थ्यांना नोकरीसाठी तसेच स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक कौशल्ये व ज्ञान विकसित करण्यात मदत होईल, असा विश्‍वास संस्थेने व्यक्त केला आहे.


कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी प्रा. कानिफ मरकड, प्रा. स्नेहा आवाजे, प्रा. चैतन्य कलावडे, प्रा. अश्‍विनी देशमुख, प्रा.नितिन पोंदे, राहुल गावडे या सर्वांनी पार पाडली.


या उपक्रमाबद्दल जलसंपदा मंत्री व संस्थेचे चेअरमन राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार व संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुजय विखे पाटील, संस्थेचे जनरल डायरेक्टर (प्रशासन) डॉ.पी.एम. गायकवाड, डायरेक्टर (टेक्निकल) प्रा.सुनील कल्हापुरे, प्राचार्य डॉ.उदय नाईक यांनी कौतुक केले आहे.        

Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

أحدث أقدم