Top News

Chitrakut School Nagar | विद्यारंभ संस्काराने चित्रकूट इंटरनॅशनल स्कूलमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात

 विद्यारंभ संस्काराने चित्रकूट इंटरनॅशनल स्कूलमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात

Chitrakut School | विद्यारंभ संस्काराने चित्रकूट इंटरनॅशनल स्कूलमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात


 Chitrakut School |  नगर : दर्शक । 

 चित्रकूट इंटरनॅशनल स्कूलमध्ये 2025-26 या नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात पारंपरिक आणि आध्यात्मिक वातावरणात विद्यारंभ संस्कार सोहळ्याने मोठ्या भक्तिभावाने करण्यात आली. यावेळी अत्यंत मंगलमय वातावरणात विद्यारंभ संस्कार, होम-हवन, आणि सरस्वती पूजन अशा पारंपरिक विधींनी झाली.


सरस्वति नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणि । विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा ॥ या मंत्रोच्चारासह ज्ञानाची देवी असलेल्या सरस्वती मातेला वंदन करून विद्यार्थ्यांच्या नव्या शैक्षणिक वाटचालीला शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे सीइओ अशोक सचदेव यांच्या हस्ते विधिवत पूजनाने झाली. त्यांनी मंत्रोच्चारासह सरस्वती पूजन करून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.


यानंतर विद्यार्थ्यांनी पारंपरिक पद्धतीने ‘सरस्वती यंत्र’ तयार करून त्यावर ‘ॐ’ आणि ‘अ’ ही विद्येची सुरुवात करणारी अक्षरे लिहिली. हा प्रसंग विद्यार्थ्यांसाठी भक्तिभाव व प्रेरणेचा अनुभव ठरला. होम-हवन विधीत शिक्षक, पालक व विद्यार्थी यांनी सामूहिक सहभाग घेत मंत्रोच्चारासह आहुती अर्पण केल्या. या प्रक्रियेत संपूर्ण परिसर भक्तिपूर्ण आणि सकारात्मक उर्जेने भारावून गेला.


कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेच्या वतीने व्यक्त करण्यात आले की, विद्यारंभ हा केवळ शैक्षणिक प्रवेश नसून, ती एक जीवनदृष्टी आहे. सरस्वती यंत्र व हवन यांद्वारे आपण ज्ञान, श्रद्धा आणि साधनेच्या वाटेवर पहिले पाऊल टाकतो. कार्यक्रमाची सांगता सामूहिक गणपती आरती आणि हनुमान चालीसा पठणाने झाली. त्यानंतर प्रसाद वाटप करून कार्यक्रमाची समाप्ती आनंदमय वातावरणात करण्यात आली.


चित्रकूट इंटरनॅशनल स्कूलमध्ये पार पडलेला हा विद्यारंभ संस्कार विद्यार्थ्यांसाठी केवळ एक धार्मिक विधी न राहता, जीवनभर लक्षात राहणारा आध्यात्मिक व संस्कारमय अनुभव ठरला.

Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

أحدث أقدم