Top News

Bhagyoday School Nagar | भाग्योदय विद्यालयात नवगतांचे औक्षण व मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप

 Bhagyoday School |  भाग्योदय विद्यालयात नवगतांचे औक्षण व मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप

Bhagyoday School | भाग्योदय विद्यालयात नवगतांचे औक्षण व मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप



Bhagyoday School | नगर : दर्शक । 

     नगर : भाग्योदय विद्यालयामध्ये नवागत विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरणही करण्यात आले. या विशेष कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सुभाष बागले यांची उपस्थिती होती. तसेच प्राचार्य ज्ञानदेव बेरड, मुख्याध्यापक बन्सी नरवडे, पालक प्रतिनिधी प्रल्हाद काकडे, सौ. माने व सौ. ढाकणे यांचाही सहभाग होता.



     कार्यक्रमाची सुरुवात बन्सी नरवडे यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करताना, पहिल्या दिवसापासूनच नियमित अभ्यास, लवकर झोपणे आणि लवकर उठणे यांचा संकल्प मुलांनी करावा, असे सांगितले.

     डॉ. बागले यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात पालकांनी मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्याचा सल्ला दिला.



 तसेच त्यांनी मुलांच्या आहारात पारंपरिक आणि पौष्टिक अन्नाचा समावेश करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. फास्टफूड टाळा, मुलांना वरण-भात, भाजी-पोळी द्या. त्यांना मैदानी खेळ खेळू द्या आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वेळ द्या, असे आवाहन त्यांनी पालकांना केले.


     प्राचार्य ज्ञानदेव बेरड यांनी शाळेच्या शैक्षणिक नियोजनाची माहिती दिली. पहिल्याच दिवसापासून अध्यापन सुरू करण्यात आले आहे. पालकांनी शाळेच्या बैठकीस उपस्थित राहून शासनाच्या शिष्यवृत्ती व इतर शैक्षणिक सुविधांचा लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले.


     या कार्यक्रमात नवागत विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले आणि त्यांना गुलाब पुष्प, बिस्किट व गोड जेवण देण्यात आले.  तसेच इ.10 वी व 12 वी. बोर्ड परिक्षेत प्रथम तीन क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. दत्तात्रय पांडुळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर आभार प्रदर्शन संतोष काकडे यांनी केले.



     कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक  कोतकर बाबासाहेब, साहेबराव कार्ले, सोपान तोडमल, धनंजय बारगळ, सौ.रेणुका गुंड, आदिनाथ ठुबे, सौ. रूपाली शिंदे, तसेच ज्युनियर कॉलेजचे कदम गोविंद, गोरक्ष कांडेकर, एकनाथ होले, गणेश गायकवाड, बाळासाहेब कावरे, सुधाकर गायकवाड आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

أحدث أقدم