Ghule Patil College | घुले पाटील महाविद्यालय येथे बी.एस्सी (डेटा सायन्स) व एम. एस्सी (कम्प्युटर सायन्स) नवीन अभ्यासक्रमांना मान्यता
Ghule Patil College | नगर : दर्शक |
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे,संलग्नित,जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे,मारुतरावजी घुले पाटील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,राघवेंद्र स्वामी मंदिराजवळ,बोल्हेगाव,नगर येथे विज्ञान व तंत्रज्ञान-बी.एस्सी(डेटा सायन्स),विज्ञान व तंत्रज्ञान-बी.एस्सी (बॉटनी)व विज्ञान व तंत्रज्ञान-एम.एस्सी(कम्प्युटर सायन्स)या नवीन अभ्यासक्रमांना मान्यता मिळाली आहे.
महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग शासन निर्णय क्रमांक मान्यता २०२५/ई-११४३३२९ शैक्षणिक वर्ष-२०२५-२६ पासून नवीन कोर्स अभ्यासक्रम/विषय मान्यता मिळाली असून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.नवीन अभ्यासक्रमांना मान्यता मिळाल्याबद्दल जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे,अध्यक्ष मा.आ.डॉ.नरेंद्र घुले पाटील,सचिव,मा.आ.चंद्रशेखर घुले पाटील,विश्वस्त डॉ.क्षितिज घुले पाटील यांनी प्राचार्य,प्राध्यापक,प्रशासकीय सेवक यांचे अभिनंदन केले.
नवीन बी.एस्सी(डेटा सायन्स)अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी शैक्षणिक पात्रता इयत्ता १२ विज्ञान शाखेतील परीक्षा गणित विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.सध्याच्या आधुनिक व तंत्रज्ञानाच्या युगात चांगला रोजगार प्राप्तीसाठी हा चांगला कोर्स/अभ्यासक्रम आहे.तरी सदर नवीन अभ्यासक्रमास नगर शहर,एमआयडीसी, औद्योगिक वसाहत व जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी या नवीन कोर्सला प्रवेश घेण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.के.पंदरकर यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे.
अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाशी संपर्क साधावा किंवा ९९६०२७७२०१ या मोबाईल नंबरवर संपर्क करावा.विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार हा नवीन कोर्स सुरू करण्यात आला आहे.
तसेच हे महाविद्यालय सन २००९ स्थापने पासून बी.एस्सी,कॉम्प्युटर सा

إرسال تعليق
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com