Savitribai Urdu School | सावित्रीबाई फुले उर्दू कन्या शाळेत विद्यार्थीनीचे गुलाबाचे फूल देऊन स्वागत व पाठ्यपुस्तकांचे वाटप
Savitribai Urdu School | नगर : दर्शक
मोहम्मदीया एज्युकेशन सोसायटीच्या संचालनाखालील सावित्रीबाई फुले उर्दू कन्या शाळा, मुकुंदनगर येथे नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थीनींना गुलाब देऊन स्वागत करण्यात आले. व पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.
या विशेष उपक्रमात मोहम्मदीया एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक आणि प्रमुख कार्यवाह प्रा. डॉ. अब्दुस सलाम सर, मखदूम सोसायटीचे अध्यक्ष आबीद दूल्हेखान, हसीब शेख, मुख्याध्यापक नौशाद सैय्यद, तसेच असलम पटेल, यास्मिन शेख, फरजाना शेख, शाहीन शेख, शेख सुलताना आणि शेख हीना, शेख उजमा यांसारखे मान्यवर उपस्थित होते.
प्रत्येक विद्यार्थ्याच्या हाती नव्या शैक्षणिक वर्षाची पुस्तके लवकरात लवकर पोहोचावीत यासाठी शाळा प्रशासनाने विशेष तयारी केली होती. यामुळे विद्यार्थी आणि पालकवर्गामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.
प्रा. डॉ. अब्दुस सलाम सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अभ्यासाच्या शिस्तीचे आणि वेळेचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी पालकांनी शाळेच्या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल मुख्याध्यापक नौशाद सैय्यद आणि त्यांच्या संपूर्ण शिक्षकवर्गाचे पालकांनी कौतुक केले.
.webp)
إرسال تعليق
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com