Top News

Bolhegao Nagar Karate | गोजू रियो कैबुकाय कराटे बेल्ट ग्रेडिंग परीक्षा उत्साहात संपन्न - नवोदित कराटेपटूंचा सन्मान

 Nagar Karate | गोजू रियो कैबुकाय कराटे बेल्ट ग्रेडिंग परीक्षा उत्साहात संपन्न - नवोदित कराटेपटूंचा सन्मान



नगर : दर्शक । 

   अहमदनगर जिल्ह्यात जापान कराटे दो कैबुकाय इंडिया फेडरेशनच्या अंतर्गत दोन महत्वाच्या कराटे बेल्ट ग्रेडिंग परीक्षा नुकत्याच यशस्वीरीत्या पार पडल्या. प्रशिक्षक व परीक्षक सेन्साई अमित प्रताप बडदे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली व शिहान शिरीष तळेकर यांच्या सल्ल्याने या परीक्षा उत्तम प्रकारे आयोजित करण्यात आल्या.


     या परीक्षांपैकी ब्लॅक बेल्ट परीक्षा 30 एप्रिल 2025 रोजी देवबाग, मालवण येथे पार पडली. याआधी कलर बेल्ट परीक्षा 06 एप्रिल 2025 रोजी राघवेंद्र स्वामी मंदिर, बोल्हेगाव एमआयडीसी, अहिल्यानगर येथे घेण्यात आली.


     या दोन्ही कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून मा. नगरसेवक व मा. सभापती कुमार भाऊ वाकळे पाटील, NIEMS चे प्राचार्य रवींद्र वरांगळे सर, युवा उद्योजक पंकज दादा वाकळे, अंबादास शिंदे सर, शंकर जारकड सर, सरपंच बाप्पुसाहेब गोरे, वकील सुरज खंडिझोड, अरुणोदय क्रीडा प्रतिष्ठानचे महेश आनंदकर सर,महिला सवरक्षण अधिकारी वैभव देशमुख सर तसेच सर्व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.



     पाहुण्यांनी सर्व कराटेपटूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व सेन्साई अमित बडदे यांच्या अथक प्रयत्नांचे विशेष कौतुक केले. परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व संबंधित बेल्ट देऊन गौरविण्यात आले.


     बेल्ट वाटपाचे तपशील पुढीलप्रमाणे: ब्लॅक बेल्ट प्राप्त कराटेपटू: सिद्धार्थ वाकळे, धनश्री अकोलकर, साक्षी थिटे, धनुष धिमते, स्वराज खरमाटे, शिवम देशमुख, वैष्णवी शिंदे, भूमिका कदम, साईनाथ थोरात, श्रुती जारकड, क्रांती बोरुडे, आरुष धिमते, सार्थक भोसले, साहिल राठोड, सारंग शिर्के. ऑफ व्हाईट बेल्ट: अनन्या गरजे, श्‍लोक बडदे, 


येलो बेल्ट: श्रद्धा वरंगळे, साई वरंगळे, मानस मित्रा, साक्षी वाघमारे, यश महाजन, आरव कांबळे, मानवी शिंदे, साईराज शिंदे, प्रथमेश जाधव, प्रणव जाधव, प्रणिती रायकर, श्‍लोक रायकर,


ग्रीन बेल्ट: श्रुती भोसले, अर्णव रोहकले, सात्विक गुप्ता, पियुष तिजोरे, पवन गवते, अनुजा मानमोडे, ब्लू बेल्ट: सात्विक शिंदे, आयुष तिजोरे,


पर्पल बेल्ट: प्रांजल पंधारे, ब्राऊन बेल्ट: सानवी गुप्ता, श्रावण जाधव


     या कार्यक्रमामुळे जिल्ह्यातील कराटे क्रीडा क्षेत्रास अधिक बळकटी मिळाली असून, विद्यार्थी वर्गात आत्मविश्‍वास व शारीरिक शिस्तीची भावना अधिक वृद्धिंगत झाली आहे. सेन्साई अमित प्रताप बडदे यांना त्यांच्या भावी उपक्रमांसाठी पाहुण्यांनी शुभेच्छा दिल्या आणि गोजू रियो कैबुकाय कराटे प्रशिक्षणाच्या विस्ताराला पाठबळ दिले.

Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

أحدث أقدم