Nagar Music | सरस्वती कला वंदना व सूर वैजयंतीचे गुरुवारी आयोजन

 सरस्वती कला वंदना व सूर वैजयंतीचे गुरुवारी आयोजन

सरस्वती कला वंदना व सूर वैजयंतीचे गुरुवारी आयोजन






नगर - येथील श्रीगोपाल रामनाथ धूत फौंडेशन,व नादब्रह्म संगीतालय यांच्या संयुक्त विद्यमाने सरस्वती कला वंदना उपक्रम व शब्द - सूर वैजयंती असे दोन उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


         सरस्वती कला वंदना उपक्रमा अंतर्गत संगीत कलेतील (गायक, वादक संगीतकार व नर्तक) विशेष तसेच साहित्य, लोककला, नाट्य, चित्रपट, चित्र, शिल्प व संस्था असे विविध क्षेत्रातील निवडक गुणी कला साधकांचे प्रणामपत्र देउन सन्मान करण्यात येणार आहे. विशेष संयोजन समिती स्थापन करून एकुण ३०० ते ३५० कलाकार यात सन्मानित केले जातील.


         गुरूवार दिनांक १६ आॅक्टोबर रोजी शब्द सूर वैजयंती या संगीत मैफलीचे माऊली सभागृहात आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ठीक ७ ते ९ या वेळेत ही छोटेखानी मैफल संपन्न होईल. A ते C पहिल्या ३ रांगा विशेष अतिथी व D ते H या ५ रांगा अपेक्षित प्रणामपत्र सन्मानीत कला साधकांसाठी राखीव असतील. बाकी आसनव्यवस्था सर्व रसिकांसाठी खुली व विनामूल्य असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य अशी असेल.


         कलावंतांना सन्मानित करणे हा संगीत प्रसार व प्रचाराचा आमचा हेतू आहे असे धूत फौंडेशनच्या प्रतीभा, वैशाली व अनूराग धूत यांनी माहिती दिली. संगीत मैफल आयोजित करून दर्जेदार कला व कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा हेतू असल्याचे नादब्रह्मचे पवन नाईक यांनी माहिती दिली. 



फौंडेशनचे सर्वेसर्वा अनुराग व श्रीगोपाल धूत यांनी नगरकर रसिकांसाठी हे विशेष आयोजन असून कला सन्मान व मैफलीतून संगीत मंच असे दोन हेतू साध्य होत असल्याचे सांगितले. परितोष व सूरूची धूत - मोहता यांनी सर्व कलाकार व रसिकांना सरस्वती कला वंदना उपक्रम व शब्द सूर वैजयंती या मैफलीस विशेष प्रतिसाद द्यावा असे नम्र आवाहन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या