Top News

साताळकर फिरता करंडक श्रीसमर्थ विद्या मंदिर प्रशालेस प्राप्त

 मानाचा दादासाहेब साताळकर फिरता करंडक श्री समर्थ विद्या मंदिर  प्रशालेस (प्राथमिक विभाग) प्राप्त










नगर : दर्शक । 
शनिवार दि ३१/०१/०२२६ रोजी महर्षी ग. ज. चितांबर विद्यामंदिर येथे नवविद्या प्रसारक मंडळ व शारदा मंदिर अहिल्यानगर, आयोजित प्राथमिक शालांतर्गत आंतरशालेय कथाकथन स्पर्धेत श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाला प्राथमिक विभागाच्या एकूण १० विद्यार्थ्यांनी गट क्र. १ व गट क्र. २ मधून सहभाग नोंदवला तसेच वैयक्तिक व सांघिक यश संपादन करून प्रशालेस अतिशय मानाचा असा दादासाहेब साताळकर फिरता करंडक प्राप्त करून दिला. 


 


         याबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक करताना प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. गुंफेकर यांनी आजचा हा क्षण अत्यंत अभिमानाचा व आनंदाचा आहे असे उद्गार काढले. तसेच विद्यार्थ्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल व फिरता करंडक मिळवल्याबद्दल त्यांचे व त्यांच्या पालकांचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचा व कलेविषयी असणाऱ्या प्रेमाचा हा गौरव आहे असे प्रतिपादन सौ. गुंफेकर यांनी केले. 




         याप्रसंगी श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष मा.श्री. दीपक ओहोळ, संस्थेचे व्हाइस चेअरमन मा.श्री. श्रीपाद कुलकर्णी, संस्थेचे सेक्रेटरी तथा शालेय समिती चेअरमन (प्राथ. विभाग) मा.श्री. सुरेश क्षीरसागर , सौ रागिणी ओहोळ यांनी देखील याप्रसंगी उपस्थित राहून सर्व मुलांचे कौतुक केले व त्यांना शुभेच्छा दिल्या. 



      स्पर्धेत पुढील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. 
गट क्र १ - कु. पूर्वा उगले, चि. सार्थक आरगडे, कु. रुद्राक्षी आव्हाड, चि. कृष्णा भाकरे, कु. सान्वी कराळे
गट क्र २ - कु. ऋचा शेवगावकर, कु. आर्या तांदळे, कु. पूर्वा सरोदे, कु. अनंती देवगुणे, कु. ओवी कुलकर्णी. 
या सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. गुंफेकर, श्रीम. प्रियंका कासार, श्रीम संपदा नगरकर व सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

       गट क्र १ मधून कु. रुद्राक्षी आव्हाड हिला तृतीय पारितोषिक तसेच गट क्र २ मधून कु आर्या तांदळे हिला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले.



तसेच याप्रसंगी दैनिक सकाळ NIE आयोजित नाट्य स्पर्धेतील श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळाच्या "उत्तरदिशेचा बागुलबुवा" ह्या बालनाट्यास मिळालेल्या दैदिप्यमान यशाबद्दल सर्व सहभागी विद्यार्थी कलाकारांचादेखील संस्थेचे पदाधिकारी, संस्थाचालक व प्राथ. विभाग मुख्याध्यापिका मा. सौ. गुंफेकर मॅडम यांनी स्नेहसन्मान केला.  


      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश पारधे, यादिवाचन प्रियंका कासार यांनी केले. आभार वृषाली कुलकर्णी यांनी मानले.

Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

أحدث أقدم