Top News

Snehalay | महिलांच्या पाठलागावर राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन राष्ट्रीय महिला आयोग आणि स्नेहालयाचा पुढाकार !

 Snehalay | महिलांच्या पाठलागावर राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन राष्ट्रीय महिला आयोग आणि स्नेहालयाचा पुढाकार !

Snehalay | नगर : दर्शक । दि. 4 फेब्रुवारी 2026 .   महिला आणि मुलींच्या वाढत चाललेल्या पाठलाग आणि छेडछाडीच्या घटना आणि त्यातूनच होणाऱ्या महिला  अत्याचारांच्या गंभीर घटनांनी समाजात अस्वस्थता आहे. या पार्श्वभूमीवर स्नेहालय संस्था आणि भारताचा राष्ट्रीय महिला




 Snehalay | नगर : दर्शक । दि. 4 फेब्रुवारी 2026 .

 महिला आणि मुलींच्या वाढत चाललेल्या पाठलाग आणि छेडछाडीच्या घटना आणि त्यातूनच होणाऱ्या महिला  अत्याचारांच्या गंभीर घटनांनी समाजात अस्वस्थता आहे. या पार्श्वभूमीवर स्नेहालय संस्था आणि भारताचा राष्ट्रीय महिला आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांचा पाठलाग ( Stalking) या विषयावरील देशातील पहिल्या कार्यशाळेचे आयोजन येथे करण्यात आले आहे.  येत्या  दि. 14 आणि 15   फेब्रुवारी 2026  रोजी होणाऱ्या  या कार्यशाळेचे उद्घाटन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा ॲड. विजया रहाटकर यांच्या बीजभाषणाने होणार आहे. महाराष्ट्रातील महिला हक्क रक्षणासाठी काम करणाऱ्या सुमारे 150 कार्यरत संस्थांना यासाठी निमंत्रित करण्यात आल्याची माहिती स्नेहालयाच्या अध्यक्षा जयाताई जोगदंडसचिव डॉ. प्रीती भोंबेखजिनदार गीता कौर यांनी दिली.




                                                             समन्वय आणि प्रशिक्षण

 महिलांच्या संरक्षण आणि हक्क रक्षणासाठी  स्नेहालयचा  स्नेहाधार उपक्रम कार्यरत आहे.या प्रकल्पाचे मानद संचालक ॲड.शाम आसावा यांनी सांगितले की,  त्रयस्थ महिलेच्या इच्छेविरुद्धनकळत किंवा तिला नको असताना तिचा  सतत पाठलाग करणेतिच्यावर पाळत ठेवणे अशा तक्रारी सतत समोर येतात. लैंगिक उद्देशाने महिलांना फोन करणेअसभ्य संदेश करणे अथवा संदेश पाठवणेसोशल मीडिया किंवा प्रत्यक्ष भेट यांद्वारे त्रास देण्याच्या तक्रारी सामाजिक संस्था आणि पोलिसांकडे सातत्याने येत असतात.हा गंभीर गुन्हा असला तरी यावर तातडीने सुयोग्य कठोर कारवाई केली जात नाही. मुळातच अशा तक्रारी धाडसाने करणाऱ्या महिलांची संख्या नगण्य असते. अशा प्रकारांची गांभीर्याने  दखल घेतली तर भविष्यात संभवणारे मोठे गुन्हे टाळता येतात.




 या दृष्टीने या प्रकरणाशी संबंध येणाऱ्या महिला संस्थासामाजिक कार्यकर्तेपोलीस ,वकीलसमुपदेशकपोलिसांचे भरोसा केंद्रमहिला बाल विकास विभागाचे सखी केंद्र यांच्यात जागरूकता आणि समन्वय  आणणे आणि प्रशिक्षण देण्याचा उद्देश्य या कार्यशाळेच्या आयोजनामागे आहे.




 स्नेहालयचे संचालक प्रवीण मुत्याल आणि स्नेहाधार प्रकल्पाच्या समन्वयक विद्या घोरपडे यांनी नमूद केले की,पाठलाग संबंधीचे कायदेतक्रार प्रक्रिया आणि सायबर छळ याविषयी देशभरातील निमंत्रित तज्ञ या कार्यशाळेत ऊहापोह करतील. कार्यशाळेत प्रज्वला या संस्थेच्या संस्थापिका पद्मश्री डॉ. सुनिथा कृष्णननामांकित विधीज्ञ  शिरीन मर्चंट,महेश भागवत (IPS - अतिरिक्त पोलीस महासंचालकतेलंगणा राज्य) महाराष्ट्र राज्याच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि महिला सुरक्षा विभाग प्रमुख  सौ. अस्वाती दोर्जे मानसोपचार तज्ञ डॉ. भूषण शुक्लाचित्रपट क्षेत्रातील अभ्यासक आणि फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट मधील प्रा. कामोद खराडे इंग्लंड मधील महिलांचा पाठलाग आणि लैंगिक अत्याचार या विषयातील तज्ञ श्रीमती कँरोलीन हॉर्नसबीआशयसंपन्न चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या आणि सत्यमेव जयते या टीव्ही मालिकेच्या संशोधन विभाग प्रमुख स्वाती भटकळआदी कार्यशाळेत संवादासाठी येणार आहेत.




यावेळी भारतीय न्याय संहिता कलम 80  अंतर्गत पाठलाग विरोधातील कायदेशीर तरतुदींवर चर्चा होईल.अशा प्रकारच्या पहिल्या गुन्ह्यासाठी 3 वर्षांपर्यंत कारावास आणि दंड. तर या गुन्ह्याची पुनरावृत्ती झाल्यास 5 वर्षांपर्यंत कारावास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते. ही कायदेशीर प्रक्रिया निर्वेध आणि तत्पर होण्याच्या संदर्भात येथे अनुभवांची देवाणघेवाण होणार आहे.



सायबर स्टॉकिंगच्या वाढत्या घटना,   सोशल मीडियाव्हॉट्सॲपइन्स्टाग्राई-मेलद्वारे होणाऱ्या छळाविरोधात IT Act 2000 अंतर्गत कारवाई कशाप्रकारे करता येतेयावर दोन सत्रात चर्चा होणार आहे . पाठलागाबद्दल तक्रार नोंदवण्याची प्रक्रियामहिला हेल्पलाईन क्रमांकसायबर क्राईम पोर्टलचा वापर याविषयी सर्वांना अवगत केले जाईल.



महिलांचा पाठलाग हा “मस्करी” किंवा “ओळख” म्हणून दुर्लक्षित न करता तो गंभीर गुन्हा आहेपीडितेची संमती नसल्यास यावर कठोर आणि तत्पर कायदेशीर कारवाई करण्याबाबत सूचना आणि उपाययोजनांवर कार्यशाळेत चर्चा होणार आहे. यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संस्थांनी 7 फेब्रुवारी 2026 पर्यंत 9011026485 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

أحدث أقدم