छेडछाडी विरोधात आता तातडीने मिळणार पोलीस संरक्षण
नगर : दर्शक ।
कामाच्या ठिकाणी होणारा महिलांचा लैंगिक छळ रोखण्यासाठी महिला एवं बाल विकास मंत्रालय मार्फत कार्यान्वित करण्यात आलेल्या 'शी-बॉक्स' (SHe Box) या ऑनलाइन प्रणालीची व्याप्ती आता लक्षणीयरीत्या वाढविण्यात आली आहे. अद्ययावत करण्यात आलेल्या या पोर्टलद्वारे महिलांना आता केवळ कार्यस्थळावरील छळच नव्हे, तर सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या छेडछाड, शेरेबाजी किंवा रस्त्यावरील उपद्रवी प्रकारांविरोधातही थेट तक्रार नोंदवता येणार आहे.
पूर्वी 'शी-बॉक्स' पोर्टलचा वापर प्रामुख्याने 'कार्यस्थल पर महिलाओं का यौन उत्पीड़न ( रोकथाम, निषेध एवं निवारण ) अधिनियम, २०१३' अंतर्गत तक्रारींसाठी मर्यादित होता. मात्र, नव्या अद्ययावतीकरणामुळे महिलांच्या सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीनेही हे पोर्टल (https://shebox.wed.gov.in) प्रभावी ठरणार आहे.
'शी-बॉक्स' ही केंद्र सरकारची एक एकात्मिक तक्रार नोंद प्रणाली असून, ती सरकारी, खासगी तसेच असंघटित क्षेत्रातील महिलांसाठी खुली आहे. या
क्रमांक नोंदवून जझ द्वारे लॉगिन होते.
पोर्टलवर तक्रार नोंदवल्यानंतर ती महिला सुरक्षेसाठी 'शी-बॉक्स' पोर्टलचे अद्ययावतीकरण करावे, त्यानंतर स्वतःची माहिती,
संबंधित आंतरिक समिती किंवा
स्थानिक समितीकडे स्वयंचलितपणे पाठवली जाते. देशभरातील मंत्रालये, विभाग, जिल्हे आणि पोलीस यंत्रणांशी डिजिटल जोडणी, नोडल अधिकाऱ्यांमार्फत तक्रारींचे निरीक्षण, ९० दिवसांच्या कालावधीत चौकशी पूर्ण करण्याची तरतूद, तक्रारदाराची गोपनीयता पूर्णपणे सुरक्षित ठेवणे आणि प्रकरणांच्या प्रगतीवर ऑनलाइन लक्ष ठेवण्याची सुविधा ही या पोर्टलची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
महिलांना अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाइन तक्रार नोंदवता येते. पोर्टलवर
कार्यस्थळ किंवा घटनास्थळ, छळाचा प्रकार आणि आरोपीची माहिती भरावी. आवश्यक असल्यास पुरावे अपलोड करून तक्रार सबमिट केल्यानंतर रेफरन्स नंबरद्वारे स्थिती ट्रॅक करता येते. जर संबंधित संस्थेची IC नोंदणीकृत नसेल, तर तक्रार आपोआप जिल्हा किंवा राज्य स्तरावरील समितीकडे पाठवली जाते.
अद्ययावत प्रणालीमुळे तक्रार प्राप्त होताच संबंधित परिसरातील पोलीस ठाण्याला तातडीने माहिती पाठवली जाते. त्यामुळे प्रशासकीय विलंब टळून पोलिसांकडून त्वरित
जाऊन Register Your Complaint पर्याय निवडावा, मोबाईल मदत मिळणे आणि संशयितांवर कायदेशीर कारवाई करणे शक्य
तक्रार नोंदविल्यानंतर पोर्टलवर लॉगिन करून Track Your Complaint विभागात जाऊन रेफरन्स नंबर, मोबाईल किंवा ईमेल वापरून तक्रारीची सद्यस्थिती, चौकशीची प्रगती आणि निकाल पाहता येतो. ईमेल व एसएमएसद्वारेही अद्ययावत माहिती मिळते.
'शी-बॉक्स' पोर्टल हे सुरक्षित आणि सन्मानजनक कार्यपरिसर निर्माण करण्यासाठी तसेच सार्वजनिक ठिकाणी महिलांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वाचे साधन ठरत आहे. डिजिटल यंत्रणेमुळे तक्रारींचे जलद निपटारा, पारदर्शकता आणि जबाबदारी वाढण्यास मदत होत आहे.
महिलांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने 'शी-बॉक्स' पोर्टल अधिक सक्षम केले आहे. महिलांनी या सुविधेचा प्रभावी वापर करून छळाविरोधात पुढे यावे. तक्रार प्राप्त होताच पोलिसांकडून तात्काळ मदत उपलब्ध करून दिली जाईल, असे आवाहन महिला व बालविकास अधिकारी संजय कदम यांनी केले आहे.
.webp)
إرسال تعليق
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com