Top News

आंबेडकर चौकात भव्य भीमपूजन ; १३५ व्या जयंतीनिमित्त उत्साहात कार्यक्रम

त्रिशरण-पंचशीलसह सामाजिक एकतेचा संदेश; आयर्न ग्रुपच्या उपक्रमास नागरिकांचा प्रतिसाद

आंबेडकर चौकात भव्य भीमपूजन ; १३५ व्या जयंतीनिमित्त उत्साहात कार्यक्रम








अहिल्यानगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त पाईपलाईन रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आयर्न ग्रुपच्या वतीने भव्य भीमपूजन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. त्रिशरण पंचशील पठण, मान्यवरांची उपस्थिती आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारे मनोगत यामुळे परिसरात जयंती उत्सवाचे प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले.


        या कार्यक्रमास ( माजी अतिरित पोलीस अधीक्षक ) शाहू साळवे , डॉ. शैलेंद्र खंडागळे, (आरोग्य अधिकारी ) डॉ. अनिल ससाने, ( माजी बँक मॅनेजर ) सुरेश शिंदे, (माजी उप कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद ) कृष्णा थोरात साहेब, तसेच बौद्धाचार्य- भाऊसाहेब देठे , उद्योजक अरविंद औसरमल यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी आपल्या मनोगतातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करत सामाजिक आणि वैचारिक भेदभाव नष्ट करून समाजहिताचे कार्य करण्याचे आवाहन केले.



        गेल्या ३६ वर्षांपासून पाईपलाईन रोड परिसरात भीमजयंतीचे आयोजन सातत्याने करण्यात येत असून, दोन पिढ्यांपासून हा उपक्रम जोमाने सुरू आहे. बौद्ध संस्कार संघाचे सदस्य दरवर्षी भीमपहाट कार्यक्रमानंतर येथे उपस्थित राहून त्रिशरण पंचशील ग्रहण करतात, ही या कार्यक्रमाची वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहे.


       कार्यक्रमादरम्यान तय्यब सय्यद यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिक यशवंत शिरसाठ, दिलीप कदम, बाळासाहेब शिरसाठ, विजय खुंटे आदींची उपस्थिती लाभली. महिलां उपासिकांचीही मोठ्या प्रमाणावर उपस्थिती कार्यक्रमात दिसून आली.



       या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रमोद शिरसाठ, संदिप कदम, विकी महितानी, राजिव कदम (पप्पू), अजय पेद्राम, अमित खुंटे, तय्यब सय्यद, महेश कदम, सुनिल वाघमारे, रवि गायकवाड, अवी इराबत्तीन, विनोद शिरसाठ, नितीन गायकवाड, शाम कातोरे, अक्षय कांबळे, अनिल राऊत, सागर परदेशी, सचिन पटेकर, सचिन शिरसाठ तसेच आर्यन्स ग्रुप, आंबेडकर चौक तरुण मंडळ आणि पाईपलाईन हडको परिसरातील कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

أحدث أقدم