Top News

Crime News | कस्टडीत असणारे एमडी विकले ; नगर गुन्हे शाखा अनेक अधिकाऱ्यांबाबत प्रश्नचिन्ह?

 Crime News | कस्टडीत असणारे एमडी विकले ; नगर गुन्हे शाखा अनेक अधिकाऱ्यांबाबत प्रश्नचिन्ह? 

Crime News | कस्टडीत असणारे वीस कोटींचे एमडी विकले ; नगरची गुन्हे शाखा आरोपीच्या पिंजऱ्यात?

नगर  : दर्शक । 


मेफेड्रोन अर्थात एमडी या अंमली पदार्थाची बेकायदेशिर विक्री करताना पुणे पोलिसांनी शिरुरमध्ये एका गॅरेजमालकाला पकडले. मात्र, त्याला एक किलोहून अधिक वजनाचा हा अंमलीपदार्थ नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असणाऱ्या शामसुंदर गुजर याने विकल्याची धक्कादायक बाब समोर आली. पुणे पोलिसांनी शामसुंदर  गुजरला पहाटे चार वाजता बेड्या ठोकल्या आणि त्याची रवानगी कोठडीत केली.


 विशेष म्हणजे गुजर याने हा अंमलीपदार्थ गुन्हे शाखेचे निरीक्षक आणि पोलिस अधीक्षक यांच्या कस्टडीत असणाऱ्या जप्त मुद्देमालातून चोरला आणि त्याची परस्पर विक्री केली. हे करताना त्याने तितक्याच वजनाचा मैदा त्या अंमलीपदार्थामध्ये टाकला असल्याची कबुलीही दिली. पुणे पोलिसांनी हे सारे उघड केले असताना नगरच्या गुन्हे शाखेसह अनेक अधिकाऱ्यांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


याबाबतची अधिक माहिती अशी की, पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) व शिरूर पोलीस ठाण्याच्या पथकाने केलेल्या संयुक्त कारवाईत शिरूर शहरात 1 किलोहून अधिक मेफेड्रोन (एमडी) अंमली पदार्थासह गॅरेज चालकाला अटक करण्यात आली. 


पुणे जिल्ह्यात अंमली पदार्थविरोधात कठोर कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शिरूर परिसरात गस्त घालत असताना अंमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. 


मिळालेल्या माहितीनुसार, शिरूर शहरातील डंबेनाला परिसरात राहणारा गॅरेज चालक शादाब रियाज शेख (वय 41) हा बाबुरावनगर परिसरातील मोकळ्या मैदानात एमडी विक्रीसाठी येणार होता. उपविभागीय पोलीस अधिकारी शिरूर विभाग यांची परवानगी घेऊन 18 जानेवारी रोजी मध्यरात्री छापा टाकण्यात ताब्यातून 1 किलो 52 ग्रॅम आला. छाप्यात आरोपीच्या वजनाचा मेफेड्रोन (एमडी) व एक दुचाकी असा सुमारे 2 कोटी 10 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दरम्यान, अटक करण्यात आलेल्या शादाब शेखचा नगरच्या एलसीबीमधील शाम गुजर याच्याशी थेट संबंध असल्याचे उघड झाले. ड्रग्स तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यात पोलीस दलातीलच कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात सापडल्याने अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. शाम गुजर याचे आरोपीशी असलेले आर्थिक व संपर्कातील व्यवहार, तसेच ड्रग्स नेटवर्कमधील सहभाग याबाबत सखोल तपास सुरू असल्याचे पुणे पोलिसांनी सांगितले.


1 किलो एमडी शिरुरमध्ये विकताना पकडण्यात आले

नगरच्या पोलिसांनी 25 किलो एमडी जप्त केला असताना त्यात दहा किलो मैदा मिक्स करुन दहा किलो एमडी बाजारात विकण्याचे धाडस शाम गुजर याने केले. त्यातील 1 किलो एमडी शिरुरमध्ये विकताना पकडण्यात आले. 



Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

أحدث أقدم