Shrirampur News | शंभूक विद्यार्थी वस्तीगृहात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
श्रीरामपूर : दर्शक ।
बहुजन शिक्षण संघ संचालित शंभुक विद्यार्थी वसतिगृहात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक संघाचे अध्यक्ष कॉं. बाळासाहेब सुरुडे व परिवर्तन फाऊंडेशनचे खजिनदार भीमराव खंडीझोड यांच्या शुभहस्ते प्रथम विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून कॉं. बाळासाहेब सुरुडे यांच्या शुभहस्ते वस्तीगृहाचे ध्वजारोहण करण्यात आले.
सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब आल्हाट राधिकाताई क्षीरसागर यांच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले तसेच नगरपालिका शिक्षण मंडळाचे माजी सदस्य सुरेश दुग्गड यांच्या वतीने विद्यार्थ्यांना दूध व बिस्किटाचे वाटप करण्यात आले.
सचिन अभंग,एम एस गायकवाड, प्रजासत्ताक हॉस्पिटलचे बाळासाहेब मोरे व माहेश्वरी राज्यस्थानी महिला मंडळाच्या वतीने तसेच आवाज जनतेचा न्यूज चॅनलच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. प्रजासत्ताक दिनानिमित्त वसतीगृहातील विद्यार्थी अनुक्रमे संग्राम तुजारे, ऋषिकेश सुलताने, नमो करंडे ,साई गायकवाड, भरत भालेराव, सुमित घुले, अजय बर्डे, आर्यन घुले या विद्यार्थ्यांनी देशावर आधारित भाषणं केली व कार्तिक चव्हाण प्रणव तागड, नरेंद्र जाधव, सागर निंभोरे, सिद्धार्थ गायकवाड, ओम जवादे, गौरव कहाते अमोल घुले व अजित जाधव या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतं सादर केली तसेच वस्तीगृहातील विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाने प्रात्यक्षिक करुन प्रेक्षकांची मने जिंकली.
याप्रसंगी विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे डॉ.सलीम शेख, हिंद सेवा मंडळाचे डॉ.नवनीत जोशी, मिशन वात्सल्य शासकीय समितीचे सदस्य मिलिंदकुमार साळवे, नामदेव शिंपी समाज पंच मंडळाचे अध्यक्ष कैलास खंदारे, पी आर पी चे संतोष मोकळ, भाजपा अल्पसंख्यांकचे साजिदभाई शेख, बहुजन वंचित आघाडीचे तालुकाध्यक्ष डॉ.गौतम चित्ते वंचितचे संतोष त्रिभुवन, सुनील वाघमारे, विद्रोही विद्यार्थी संघटनेचे ॲड.अमोल सोनवणे, परिवर्तन फाउंडेशनचे गोरख आढाव, सामाजिक कार्यकर्ते अरुणराव मंडलिक, शासकीय वस्तीगृहाचे काळमेख सर, गायकवाड मॅडम,कविता दिवे,शिवानी दिवे, सरिता दिवे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वीतेसाठी सिद्धार्थ दिवे यांनी परिश्रम, अशोक दिवे यांनी सूत्रसंचालन आणी ॲड. अमोल सोनवणे यांनी आभार प्रदर्शन केले.
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर
.jpeg)
إرسال تعليق
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com