Ahmednagar Shivsena: हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्यावतीने अभिवादन
Ahmednagar Shivsena: अहमदनगर (प्रतिनिधी) - हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे शिवसैनिकांचे दैवत आहेत, त्यांनी घालून दिलेल्या विचारांवरच शिवसैनिक काम करत आहे. सर्वसामान्यांमध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी चेतना जागृत करुन शिवसैनिक तयार केला आहे आणि तो कधी मोडणार नाही, झुकणारही नाही. बाळासाहेब ठाकरे हे सर्वसामान्यांना न्याय देणारे होते. त्यांच्या विचारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम करत आहे, असे प्रतिपादन शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी केले.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्यावतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले याप्रसंगी जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे, शहरप्रमुख दिलीप सातपुते,
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता अहमदनगर जिल्हा प्रमुख चंद्रकांत उर्फ काका शेळके, युवा सेना जिल्हाप्रमुख आकाश कातोरे, युवा सेना शहरप्रमुख योगेश गलांडे, अभिषेक भोसले, अनिकेत कराळे, नगर शहर प्रवक्ता विशाल शितोळे, भिंगार शहर प्रमुख सुनील लालबोंद्रे, अनिल लोखंडे, मयूर गायकवाड, आनंदराव शेळके, दामोदर भालसिंग, रवींद्र लालबोंद्रे व शिवसैनिक उपस्थित होते.
पुढे बोलतांना दिलिप सातपुते म्हणाले, महाराष्ट्राचे एक असे व्यक्तिमत्व होते ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचे मन जिंकले. बाळासाहेबांनी शिवशेना पक्षाची स्थापना करून मराठी माणसाला एकवटण्याचे कार्य केले. आज आपण हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे प्रेरणादायी विचारातून एक नवीन चैतन्य निर्माण होते, असे सांगितले.
याप्रसंगी अनिल शिंदे, आकाश कातोरे, आनंदराव शेळके आदिंनी आपल्या मनोगतातून स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्याचा गौरव केला.

إرسال تعليق
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com