पंडित हॉस्पिटलमध्ये १० व्या महिला महा-आरोग्य शिबिराला सुरुवात
नगर : दर्शक
नगर शहरातील कोठी रोडवरील पंडित हॉस्पिटल थ्रीडी लॅप्रोस्कोपी आणि मॅटर्निटी केअर सेंटर येथे डॉ. सविता अशोक पंडित यांच्या स्मरणार्थ आयोजित १० व्या महिला महा-आरोग्य शिबिराचा प्रारंभ झाला.
या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे लॅप्रोस्कोपीद्वारे शस्त्रक्रिया झालेल्या महिला रुग्णांनी शिबिराचे उद्घाटन केले. आधुनिक थ्रीडी लॅप्रोस्कोपी तंत्रज्ञानामुळे शस्त्रक्रियेनंतर अवघ्या ६ तासांत रुग्ण चालू-फिरू लागतात व अन्नसेवन सुरू करू शकतात, तसेच एका दिवसात डिस्चार्ज देण्यात येतो, हे या शिबिरातून समोर आले.
हे शिबिर डॉ. हृषिकेश अशोक पंडित (सुप्रसिद्ध एंडोस्कोपिक गायनकोलॉजिकल सर्जन) व डॉ. मोनिका हृषिकेश पंडित (प्रसूती व वंध्यत्व उपचार एक्सपर्ट) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केले आहे.
डॉ. हृषिकेश पंडित यांनी जर्मनी, फ्रान्स, दुबई तसेच टाटा कॅन्सर हॉस्पिटल येथून विशेष प्रशिक्षण घेतले असून सलग चार वेळा अमेरिकेतील सर्वोच्च कॉन्फरन्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. डॉ. मोनिका पंडित या दुबई व अमेरिका येथून प्रशिक्षित प्रसूती तज्ज्ञ व वंध्यत्व चिकित्सक आहेत.
पंडित हॉस्पिटल हे एंडोमेट्रीओसिस व गायनेक कॅन्सर उपचारासाठी भारतातील अग्रगण्य केंद्र म्हणून ओळखले जाते. कॅन्सर शस्त्रक्रियांसाठी येथे ICG Dye Technology उपलब्ध आहेत. त्यामुळे कॅन्सरग्रस्त पेशी अचूकपणे ओळखून सुरक्षित व प्रभावी शस्त्रक्रिया करता येते.
गेल्या ९ वर्षांत या शिबिरामार्फत ७५० हून अधिक महिलांवर दुर्बिणीद्वारे यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. यावर्षीही २७ ते २९ जानेवारी २०२६ या कालावधीत महिलांसाठी सर्व गायनेक शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
शिबिरात लॅप्रोस्कोपिक गर्भाशयाच्या कॅन्सर सर्जरी, एंडोमेट्रीओसिस सर्जरी, गर्भाशय न काढता गाठी काढणे, टोटल लॅप्रोस्कोपिक हिस्टेरेक्टॉमी, अंडाशयाच्या गाठी काढणे, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया उलटवणे, वंध्यत्व निवारणासाठी लॅप्रोस्कोपी व हिस्टेरोस्कोपी
या शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात करण्यात येणार असून केवळ औषधे व भूलतज्ज्ञ फी आकारली जाईल. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते प्रा. हर्षल आगळे,लेप्रोस्कोपी प्रशिक्षणासाठी आलेले डॉक्टर्स उपस्थित होते. कॅम्प यशस्वी साठी हॉस्पिटल स्टाफ चे सहकार्य लाभले.

إرسال تعليق
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com