BurhanNagar | बुऱ्हानगर येथे गुरुकृपा व प्रगती महिला गृहउद्योगाचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा
BurhanNagar | नगर : दर्शक
नगर शहराजवळील बुऱ्हानगर येथे गुरुकृपा महिला गृहउद्योग व प्रगती महिला गृहउद्योग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वर्धापन दिनानिमित्त महिलांच्या उद्योजकतेला चालना देण्यासाठी ई-कॉमर्स मार्गदर्शन कार्यशाळा तसेच आयात-निर्यात धोरण मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेत कार्टेज ई-कॉमर्स सोल्युशन, पुणे येथील विनोद शेलार, झेड फॅसिलिटर प्रवीण वाघमारे, माजी नगरसेवक व उद्योजक अभय बोरा, अॅड. स्वाती जाधव, शिवसेना शहर जिल्हाध्यक्ष सौ. अश्विनी झरेकर (संचालिका – युनिक इन्स्टिट्यूट ट्रेनिंग सेंटर) आदी मान्यवर उपस्थित होते. मार्गदर्शन करताना वक्त्यांनी महिलांना डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून व्यवसाय विस्ताराच्या संधी, ऑनलाइन विक्री-विपणन, तसेच आयात-निर्यात धोरणातील मूलभूत बाबी समजावून सांगितल्या.
या कार्यक्रमाचे आयोजन चित्रा शिंदे (गुरुकृपा महिला गृहउद्योग), गीतांजली फासे (प्रगती महिला गृहउद्योग) व हर्ष नितीन लिगडे पाटील यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमास बुऱ्हानगरचे सरपंच रावसाहेब कर्डिले, ग्रामसेवक शेळके भाऊसाहेब, संदीप कर्डिले, प्रवीण वाघमारे, विनोद शेलार, अपंग सेलचे अध्यक्ष महेश बारगजे, प्रियंका कर्डिले, विद्या तापकिरे, पै. यश लिगडे यांच्यासह चटणीवाला डॉट कॉम परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमास परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी संक्रांतीनिमित्त सौ. सविता नितीन लिगडे यांनी महिला भगिनींना तिळगुळ व वाण देत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. महिलांच्या स्वयंरोजगाराला नवे दिशा देणारा हा उपक्रम ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
إرسال تعليق
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com