Meherbaba Nagar | मेहेरबाबांच्या ३ दिवसीय अमरतिथी सोहळास ३० जाने ला प्रारंभ
नगर : दर्शक
येथील अरणगाव रोडवरील मेहेराबाद येथे अवतार मेहेरबाबा यांच्या समाधीस्थळी ५७ वी अमरतिथी (पुण्यतिथी)सोहळा दि.३० जाने.ते १ फेब्रुवारी २६पर्यंत होणार असून यासाठी देशातून सुमारे लाखाच्यावर व परदेशातून सुमारे ५०० बाबाप्रेमी, भाविक येतील अशी माहिती विश्वस्त मेहेरनाथ कलचुरी यांनी दिली.
मेहेरबाबांचे असंख्य भक्त जगात असून असंख्य केंद्रेही आहेत.सर्व जाती धर्मातील लोकांना मानवतेचा व सत्याचा संदेश देत त्यांनी जगभर प्रवास केला जगात मी कोठेही देह सोडला तरी मेहेरावाद येथे बांधलेल्या समाधीत मला समाधीस्त करावे असे त्यांनी सांगून ठेवले होते ३१ जाने १९६९ रोजी त्यांचे महानिर्वाण झाले.म्हणून या ठिकाणी अमरतिथी सोहळ्यासाठी लाखो भाविक येत असतात.
याबाबत अधिक माहिती देताना चेअरमन फॉमरोज मिस्री म्हणाले दि.३०जाने.रोजी सकाळी १० वा बाबांची प्रार्थना,आरतीने कार्यक्रमास प्रारंभ होईल.नंतर रात्री १२ वाजेपर्यंत फिल्म शो,तसेच विविध केंद्रावरुन आलेले लोक भजने म्हणतील,दि.३१ रोजी सकाळी ७ वा आरती प्रार्थना होईल व कार्यक्रम सुरु होईल सकाळी ११ वाजता चेअरमन फॉमरोज मिस्री यांचे व्याख्यान होईल,त्यानंतर मेहेर धून म्हटली जाईल.बाबानी देहत्याग केला त्यावेळी दुपारी १२ वाजता १५ मिनिटे मौन पाळले जाईल व नंतर सर्व भाषांमधून आरती प्रार्थना होईल.नंतर लगेच कार्यक्रम सुरु होईल तो रात्री१२ वा पर्यंत लोक भजने बाबावरील सांस्कृतीक व नृत्याचा कार्यक्रम,नाटक,गजल, इ. कार्यक्रम सादर करतील.
दि. १ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वा कार्यक्रम सुरु होईल व दु.१ वाजता आरती, प्रार्थना होऊन कार्यक्रमाची सांगता होईल.दर्शनासाठी भाविकांना नंबर दिले जात असल्याने त्याप्रमाणे रांग लागते.त्यामुळे गडबड गोंधळ होण्याचा प्रसंग येत नाही.संपूर्ण शांततेत शिस्तबध्द पध्दतीने हा उत्सव संपन्न होतो.ट्रस्टच्या वतीने सध्या कार्यक्रमासाठी भव्य असा मंडपाची उभारणी चालू असून येणा-या भाविका साठी स्त्री व पुरुषांसाठी मोठे तंबू उभारण्याचे काम चालू असून त्यांना आंघोळीसाठी गरम पाणी,संडास बाथरुमची सोय, आरोग्य सेवा या सेवा उपलब्ध राहणार असून येथे सुमारे ४० हजार भाविक राहतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे.तर रेल्वेस्टेशन व बसस्थानक येथून भाविकांच्या सोयी साठी समाधी स्थळापर्यंत बसेस ची सोय आहे. हजारो युवक स्वयंसेवकांचे काम करीत आहे
मेहेरबाबा भक्तांच्या माहितीसाठी
नगर शहरातील मध्यवस्तीत सरोष पेट्रोल पंपा जवळ, प्रसिद्ध उद्योगपती नरेंद्र फिरोदिया यांच्या आय लव्ह नगर आफिसच्या पाठीमागे, बंद पडलेल्या दीपाली टॉकीज शेजारी नगर मनपाच्या सरोष बागे जवळ झेंडीगेट येथे अवतार मेहेरबाबा यांनी आपल्या जीवनातील अनेक आठवणी या ठिकाणी अजूनही आहेत आणि शहरातील मध्यवस्तीत या केंद्रावर मेहेरबाबा यांनी अमेरिका, फ्रांस,जर्मनी,रशिया इराण,इराक,ऑस्ट्रेलिया, लंडन,आफ्रिका, युक्रेन तसेच जगभरातील त्यांचे भक्त शहरातील या केंद्रावर बाबांच्या भेटीला यायचे आणि येथे मुकामाने राहायचे अरणगावचे मेहेरबाद आणि पिपंळगावचे मेहेरज़ाद बरोबर नगर शहरातील मेहेरबाबा यांचे हे निवासस्थान अत्यन्त महत्वाचे होते आणि बाबांना या केंद्रावर विशेष प्रेम होते याचे अनेक पुरावे आपल्याला मिळतील.
إرسال تعليق
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com