Hind Seva Mandal: दीप चव्हाण, वसंत लोढा व अनिल गट्टाणीचा विरोध, शाब्दिक खडाजंगी
अहमदनगर (प्रतिनिधी) -मधील हिंद सेवा मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बहुचर्चित जागेचा ताबा सोडण्याचा विषय सभासदांनी 'मंजूर-मंजूर'च्या घोषणा देत मंजूर केला.रविवारी सायंकाळी ही सभा पार पडली.अध्यक्ष शिरीष मोडक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत सदस्य दीप चव्हाण,वसंत लोढा व अनिल गट्टाणी यांनी जागेचा ताबा सोडण्यासाठी घेतला जाणारा २५ कोटी रुपये मोबदला,राबवली जात असलेल्या प्रक्रियेला विरोध केला.यावेळी किरकोळ शाब्दिक खडाजंगी झाली.
गेल्या काही दिवसांपासून हिंद सेवा मंडळाच्या जागेचा विषय गाजत आहे.मंडळाच्या सभेत हा विषय घेण्यात आला होता.सुरुवातीला इतिवृत्त मंजूर झाल्यावर अध्यक्ष मोडक यांनी जागेचा विषय मांडला.आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर अॅड.अनंत फडणीस यांनी विषयाची माहिती व कायदेशीर माहिती, प्रक्रिया सांगितली.त्यानंतर चव्हाण, लोढा,गट्टाणी यांनी विरोध दर्शवला.यावेळी बोलू देण्याची मागणी करत व काही कायदेशीर मुद्द्यांवर चर्चा करताना पदाधिकाऱ्यांशी खडाजंगीही झाली.
त्यानंतर इतर काही सदस्यांनीही भूमिका मांडली.शेवटी सदस्यांनी मंजूर-मंजूरच्या घोषणा देत विषयाला मंजुरी दिली.वसंत लोढा यांनी कमी किमतीत्त ताबा सोडू नका,मी जास्त किंमत देणारा माणूस महिनाभरात देतो, असे सांगितले.त्यावर विचार करू, असे अध्यक्षांनी सांगितले व सभा संपली.

إرسال تعليق
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com