Patrakar Din Ahmednagar: समाजातील प्रश्न पत्रकार मांडतात त्यामुळे पदाधिऱ्यांना कामे करणे अधिक सोपे जाते : आमदार संग्राम जगताप
Patrakar Din Ahmednagar: अहमदनगर : ‘‘समाजातील प्रश्न पत्रकार मांडतात. त्यामुळे पदाधिकारी, अधिकाऱ्यांना कामे करणे अधिक सोपे जाते. शहराचा विकास झपाट्याने होत आहे. त्यामध्ये पत्रकार वारंवार भूमिका घेऊन लिखान करतात. विकासाच्या प्रक्रियेत त्यांची भूमिका महत्त्वाची आहे,’’ असे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.
‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त अहमदनगर प्रेस क्लब, अहमदनगर पत्रकार संघ व अहमदनगर महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आज महानगर पालिकेच्या राजमाता जिजाऊ सभागृहात पत्रकार दिन साजरा करण्यात आला. या वेळी अध्यक्षीय भाषणात आमदार जगताप बोलत होते. व्यासपीठावर जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ,जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे, ज्ञानेश कुलकर्णी,अशोक झोटिंग,आदिल शेख,सुशील थोरात आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले,की समाजातील प्रश्नांबाबत पत्रकार भूमिका मांडतात. हे लिखान पदाधिकारी, अधिकाऱ्यांना मार्गदर्शक ठऱते. पत्रकारांची कामाची धावपळ आपण पाहतो. त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. वेळेचे महत्त्व लक्षात घेऊन कामांचे नियोजन करायला हवे.
‘मनपा’च्या वतीने स्व. महेंद्र कुलकर्णी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख यांना प्रदान करण्यात आला. ५१ हजार रुपये व स्मृतिचिन्ह असे त्याचे स्वरुप होते.
स्व. महेंद्र कुलकर्णी उत्कृष्ठ बातमीदार पुरस्कार मोहिनीराज लहाडे यांना प्रदान करण्यात आला.३१ हजार रुपये व स्मृतिचिन्ह असे त्याचे स्वरुप होते.


إرسال تعليق
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com