Urdu School: मातोश्री उर्दू हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न
Urdu School: अहमदनगर - आलमगीर येथील अलफलाह एज्युकेशन अॅण्ड वेलफेअर सोसायटी संचलित मातोश्री उर्दू हायस्कूल, अलहाज शेख अ. अजीज उर्दू ज्युनि. कॉलेज ऑफ आर्टस्चे वार्षिक स्नेहसंमेलन विद्यालयाच्या प्रांगणात उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक व सचिव अल्हाज प्रा. डॉ. शेख अब्दुस सलाम सर होते, तर बुऱ्हाणनगर केंद्राचे केंद्रप्रमुख संजय धामणे व केंद्र शाळेचे मुख्याध्यापक अनिल आंधळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना व प्रोत्साहित करण्यासाठी शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे अत्यंत गरजेचे असल्याचे प्रतिपादन प्रा. डॉ. सलाम सर यांनी केले.
सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर केले. नारीशक्ती, मोबाईलच्या अतिवापराने होणारे दुष्परिणाम, हुंडाबंदी विषयांवर नाटिका सादर केल्या. कार्यक्रमास पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी पालकांसह अनेकांनी विद्यार्थ्यांना रोख रकमेचे बक्षीस दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खान निशात यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. शेवटी शेख अंजुम यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
.jpg)
إرسال تعليق
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com