Top News

देवाभाऊ नावाची मेहंदी रेखाटली

‘देवा भाऊ’ची मेहंदी रेखाटून व अनामप्रेम संस्थेत पेढे वाटून साजरा केला शपथविधीचा आनंदाेत्सव

देवाभाऊ नावाची मेहंदी रेखाटली




नगर - राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे व अजित पवार यांचा गुरुवारी सायंकाळी शपथविधी झाल्यावर लगेचच शहर भाजपाच्यावतीने पक्ष कार्यालयात जल्लाेषात महायुतीचा शपथविधीचा आनंदाेत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी फटाक्यांची आतषबाजी करून अनामप्रेम संस्थेमधील विद्यार्थ्यांना पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. तसेच भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी  हातावर मेहंदीने ‘देवा भाऊ’ रेखाटून अनाेखा पद्धतीने आनंद व्यक्त केला. यावेळी एकच भाऊ देवा भाऊ..., एकच नाथ एकनाथ व एकच वादा अजितदादा अशा जाेरदार घाेषणा देण्यात आल्या.

शहर भाजपचे बहुतांशी पदाधिकारी मुंबई येथे शपथविधी साेहळा प्रत्यक्ष पाहण्यासाठी गेले असल्याने 
माेजक्या पदाधिकाèयांनी हा आनंदाेत्सव उत्साहात साजरा केला. यावेळी सरचिटणीस प्रशांत मुथा व माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी टाक्यांची लड पेटवून आतषबाजी केली.

यावेळी श्वेता झाेंड, नीता फाटक , सुरेखा जंगम, ज्याेती दांडगे, रेणुका करंदीकर, गाेपाल वर्मा, सुहास पाथरकर, राहुल जामगावकर, अभिजीत ढाेणे, प्रशांत बाेèहाडे, धीरज पडाेळे, दीपक दंडनाईक, पियुष तावरे, प्रा.सुनील पंडित, गणेश गवळी, गणेश कानगावकर, ज्ञानेश्वर धिरडे, दीपक उमाप, सुनील सकट, राेहित पठारे, अशाेक भाेसले, भानुदास बनकर, विक्रम शिंदे, सचिन पळशीकर, राजेंद्रफ  ुलारे, भार्गवफ  ुलारे आदी उपस्थित हाेते.


देवाभाऊ नावाची मेहंदी रेखाटली






Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

أحدث أقدم