Top News

PA Inamdar University | दहावी–बारावीनंतर योग्य दिशा निवडण्यासाठी मार्गदर्शन आवश्यक – उपकुलपती डॉ.एम.ए.लाहोरी

 PA Inamdar University |  इकरा एज्युकेशन सोसायटीच्या वतीने करिअर गायडन्स कार्यक्रम संपन्न

PA Inamdar University | दहावी–बारावीनंतर योग्य दिशा निवडण्यासाठी मार्गदर्शन आवश्यक – उपकुलपती डॉ.एम.ए.लाहोरी





PA Inamdar University | नगर : दर्शक । 
- दहावी व बारावीनंतर केवळ गुणांवर नव्हे तर विद्यार्थ्यांच्या आवड, क्षमता व कौशल्यांचा विचार करून करिअरची निवड करणे अत्यंत गरजेचे आहे.आज शिक्षणा सोबत कौशल्य विकासालाही तितकेच महत्त्व आहे. वैद्यकीय, अभियांत्रिकी, कला, वाणिज्य, विज्ञान, तांत्रिक शिक्षण, व्यावसायिक अभ्यासक्रम यासोबतच स्पर्धा परीक्षा व स्वयंरोजगाराच्या संधीही विद्यार्थ्यांसमोर खुल्या आहेत. योग्य माहिती व योग्य मार्गदर्शन मिळाल्यास विद्यार्थी यशस्वी वाटचाल करू शकतात.असे प्रतिपादन डॉ.पी.ए. इनामदार युनिव्हर्सिटीचे उप कुलपती डॉ.एम.ए. लाहोरी यांनी केले.



इकरा एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीच्या वतीने दहावी व बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी पुढे कोणत्या क्षेत्रात करिअर घडवावे, याबाबत मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने  आयोजित करण्यात आलेला करिअर मार्गदर्शन कार्यक्रम पी.ए. इनामदार इंग्रजी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज,मौलाना आझाद उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, अहमदनगर उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर काॅलेज, मातोश्री उर्दू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, अहमदनगर हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये उत्साहात संपन्न झाले. 


यामध्ये पुणे येथील डॉ.पी.ए. इनामदार युनिव्हर्सिटीचे उप कुलपती डॉ. एम.ए.लाहोरी, कार्यालय सुप्रिंटेंडंट अकील शेख, सहाय्यक प्राचार्य ए.आर.विनीश देसाई, सहाय्यक प्राचार्य अफान खान, प्लेसमेंट ट्रेनिंग ऑफिसर ताहीर खान,संचालक डॉ एजाज शेख या तज्ञांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली. यावेळी इकरा एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे उपाध्यक्ष इंजि. इकबाल सय्यद, सचिव विकार काझी, प्राचार्य युनुस सलीम,प्राचार्या फरहाना शेख,प्राचार्य मुन्नवर हुसेन, प्राचार्य जमीर शेख,प्राचार्य श्रीमती शाहीदा आदी उपस्थित होते.



सहाय्यक प्राचार्य अफान खान यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, अपयशाची भीती न बाळगता सातत्य, मेहनत व सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर कोणत्याही क्षेत्रात यश मिळवता येते. पालकांनीही मुलांवर अनावश्यक दबाव न टाकता त्यांच्या निर्णयांना साथ द्यावी.



कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांच्या शंका–समाधान सत्रात उपस्थित तज्ज्ञांनी विविध प्रश्नांना सविस्तर उत्तरे दिली. या मार्गदर्शन कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण व करिअर निवडीसाठी स्पष्ट दिशा मिळाल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

أحدث أقدم