Top News

Savedi | मकर विलक्कु उत्सवात अयप्पा मंदिरात शिव आराधना प्रवचन संपन्न

  Savedi | मकर विलक्कु उत्सवात अयप्पा मंदिरात  शिव आराधना प्रवचन संपन्न 





            नगर– येथील अयप्पा मंदिरात ६० दिवसीय मंडल- मकरविलक्कु वार्षिक उत्सवास सुरवात झाली आहे.त्यानिमित्त रोज धार्मिक कार्यक्रम होत असून यामध्ये  ३ दिवसीय  दिव्य ज्योती जागृती संस्थान द्वारे भगवान शिव आराधना या प्रवचनाचे ३ दिवसीय आयोजन करण्यात आले होते यामध्ये अमोघनंद महाराज यांनी आपल्या मधुर वाणीतून  शिव कथा सांगून भाविकांचे प्रबोधन केले आहे.



 

     ३ दिवसात महाराज म्हणाले  दिव्य ज्योति जाग्रति संस्थान एक सामाजिक व आध्यात्मिक संस्था आहे त्याचे  संस्थापक आशुतोष महाराज आहेत .  संस्थेच्या माध्यमातून समाजाच्या सर्वांगिन विकासासाठी सामाजिक व आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. याच श्रृंखले अंतर्गत अय्यप्पा मंदिरामध्ये अय्यप्पा सेवा समितीच्या वतीने शिव आराधन सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते 




या कार्यक्रमात शाश्वत धर्मग्रंथ व भजनांच्याआधारे खालील सर्व प्रश्नांवर प्रकाश टाकण्यात आला  भगवान शिवजी कोणत्या भक्तीने प्रसन्न होतात भगवान शिवजीचे दिव्य स्वरूप समाजाला कोणती शिकवण देत आहे ग्रंथानुसार शिवतत्त्व प्राप्त करून देणारा भक्तीचा शाश्वत मार्ग कोणता वर्तमानकाळात शिवतत्त्वाचे दर्शन संभव आहे का भगवान शिवजींनी गुरूगीतेमध्ये खऱ्या सद्‌गुरूची ओळख सांगितली आहे. ती कोणती ,ग्रंथानुसार ध्यानाची (Meditation) शाश्वत पध्दत कोणती  या व अशा सारख्या अनेक प्रश्नांची समाधान कारक उत्तरे दिली   





                ६० दिवसाच्या या मंडल-मकरविलक्कु उत्सवात  मंदिरात दररोज विविध कार्यक्रमांचे आयोजन तसेचरोज  महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.सर्व नागरिकांनी या कार्यक्रमांना उपस्थित राहून अध्यात्मिक पर्वतीचा लाभ घ्यावाअसे आवाहन अय्यप्पा सेवा समितीचे अध्यक्ष बाबुशेठ टायरवालेसचिव वसंत सिंग,उपाध्यक्ष राजू लक्ष्मणसेक्रेटरी के.उदयकुमार व खजिनदार पी. सत्यान नायर आदींसह भाविक भक्तांनी केले  आहे

Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

أحدث أقدم