Top News

सौ.मनीषा तावरे यांना हिंदी विषयांमध्ये पी.एच.डी पदवी प्रदान

 सौ.मनीषा कल्याण तावरे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची हिंदी विषयांमध्ये पी.एच.डी पदवी प्रदान

सौ.मनीषा तावरे यांना हिंदी विषयांमध्ये पी.एच.डी पदवी प्रदान





नगर : दर्शक 
शिवनगर विद्या प्रसारक मंडळ इंग्लिश मीडियम स्कूल, आंदोबावाडी, तालुका बारामती, जिल्हा पुणे येथील शिक्षिका सौ मनीषा कल्याण तावरे यांना सावित्रीबाई फुले पुणे वि‌द्यापीठ यांची हिंदी विषयासाठी विद्यावाचस्पती (पीएचडी) पदवी प्रदान करण्यात आली. 


त्यांनी " राजी सेठ और विजया राज्याध्यक्ष की कहानी साहित्य का तुलनात्मक अध्ययन " या विषयावर स्नातकोत्तर हिंदी विभाग व अनुसंधान केंद्र, न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज (स्वायत्त) या केंद्रामधून संशोधन कार्य पूर्ण केले केले. या संशोधनकार्यासाठी त्यांना सारडा महाविद्यालय, अहिल्यानगर येथील माजी प्राचार्या डॉ. अमरजा रेखी यांनी मार्गदर्शक व डॉ. सुनिता मोटे यांनी सह मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन केले.



       त्यांच्या या संशोधनकार्यासाठी केंद्र संचालक संचालक डॉ. हनुमंत जगताप तसेच डॉ. अशोक गायकवाड व डॉ. सोपान दहातोंडे यांचे मार्गदर्शन लाभले. सौ तावरे यांना पीएचडी प्राप्त झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे व महावि‌द्यालया मधील प्राध्यापक वर्ग यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

أحدث أقدم