Top News

कवडे नगरच्या पाणी प्रश्नावर प्रभाग ५ चे नगरसेवक सक्रिय

 कवडे नगरच्या पाणी प्रश्नावर प्रभाग ५ चे नगरसेवक सक्रिय

नगर : दर्शक




नगर : दर्शक 

नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर सत्कार व अभिनंदनाला बाजूला ठेवत थेट नागरिकांच्या प्रश्नांवर काम करण्याचा सकारात्मक संदेश प्रभाग क्रमांक ५ मधील नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांनी दिला आहे. “सत्कार नको, कामे सांगा” या भूमिकेतून नगरसेवक धनंजय जाधव, जितू गंभीर, जय भोसले आणि मोहित पंजाबी यांनी कवडे नगर परिसरातील गंभीर पाणीपुरवठा समस्येचा तातडीने आढावा घेतला.



कवडे नगरमध्ये मागील अनेक दिवसांपासून अपुरा व अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त होते. या पार्श्वभूमीवर चारही नगरसेवकांनी पाणीपुरवठा विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना थेट परिसरात बोलावून घेतले. नागरिकांच्या उपस्थितीत पाणी समस्येवर सविस्तर चर्चा करण्यात आली व तात्काळ उपाययोजना करण्याच्या स्पष्ट सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.



यावेळी कवडे नगरमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी आपल्या अडचणी थेट नगरसेवकांसमोर मांडल्या. “निवडणूक जिंकल्यानंतर नाही तर पहिल्याच दिवसापासून कामाला सुरुवात केली पाहिजे” असा विश्वास नगरसेवकांनी व्यक्त केला.



नव्याने निवडून आलेल्या या चारही नगरसेवकांच्या कार्यपद्धतीमुळे प्रभाग ५ मधील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, पुढील काळात मूलभूत सुविधा सुधारण्यासाठी ठोस कामे होतील, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

أحدث أقدم