Top News

कर्नल परब’स शाळेत अत्याधुनिक टर्फचे उद्घाटन

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळांना प्रोत्साहन

कर्नल परब’स शाळेत अत्याधुनिक टर्फचे उद्घाटन





नगर : दर्शक ।
येथील कर्नल परब’स शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या शारीरिक व क्रीडा विकासाला चालना देण्यासाठी अत्याधुनिक टर्फचे उद्घाटन शाळेचे संचालक रिकी राज परब यांच्या शुभहस्ते नुकतेच संपन्न झाले.


     शैक्षणिक प्रगतीसोबतच विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा तसेच दर्जेदार खेळाडू घडावेत, या उद्देशाने या टर्फची निर्मिती करण्यात आल्याचे परब सर यांनी सांगितले. या टर्फवर विद्यार्थ्यांना बास्केटबॉल, क्रिकेट व फुटबॉलसारखे विविध खेळ खेळण्याची सुविधा उपलब्ध असून, अन्य खेळांसाठी शाळेचे स्वतंत्र पटांगणही उपलब्ध आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी अनेक खेळांचा सराव करता येणार आहे.


विद्यार्थ्यांनी आजपर्यंत शाळेचे नाव विविध स्तरांवर उज्वल केले आहे. त्यामुळे त्यांना खेळाशी संबंधित उत्तम सुविधा देणे हे आपले कर्तव्य असल्याचे परब मॅडम यांनी यावेळी नमूद केले. टर्फच्या उद्घाटनामुळे विद्यार्थी अत्यंत आनंदित असून, येत्या काळात विविध क्रीडा स्पर्धांमध्ये यश संपादन करून शाळेचे नाव आणखी उंचावण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.


     परब सर व परब मॅडम यांचे विद्यार्थ्यांसाठी पाहिलेले स्वप्न साकार झाल्याने शिक्षकवृंदातही आनंदाचे वातावरण आहे. कर्नल परब’स शाळेतील अनेक विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावरील खेळांसाठी निवड झाली असून, नव्याने उभारण्यात आलेल्या या टर्फमुळे भविष्यात अनेक गुणवंत खेळाडू घडतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
या टर्फच्या निर्मितीसाठी परब सर व परब मॅडम यांच्यासह योगेश शिंगवी, निखिल परभणे व डॉ. भाऊसाहेब खिलारी यांचे मोलाचे योगदान लाभले.


उद्घाटन प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका अर्पिता रननवरे, सनबीम्सच्या प्रमुख भावना शिंगवी, शाळेतील शिक्षक, क्रीडा शिक्षक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

أحدث أقدم