Top News

अहमदनगर सेंट्रल अॅडव्होकेटस् बार असोसिएशनला खासदार अॅड. उज्ज्वलजी निकम यांची सदिच्छा भेट

 अहमदनगर सेंट्रल अॅडव्होकेटस् बार असोसिएशनला खासदार अॅड. उज्ज्वलजी निकम यांची सदिच्छा भेट

अहमदनगर सेंट्रल अॅडव्होकेटस् बार असोसिएशनला खासदार अॅड. उज्ज्वलजी निकम यांची सदिच्छा भेट




नगर -: अहमदनगर सेंट्रल अॅडव्होकेटस् बार असोसिएशनला मंगळवार, दि. १३ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रपती नियुक्त खासदार तसेच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध फौजदारी व विशेष सरकारी वकील मा. अॅड. उज्ज्वलजी निकम यांनी सदिच्छा भेट दिली. त्यांच्या या भेटीमुळे बार असोसिएशनच्या सभागृहात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.


      या प्रसंगी बार असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष अॅड. विश्वासराव आठरे पाटील व माजी अध्यक्ष अॅड. अशोक कोठारी यांच्या हस्ते मा. अॅड. उज्ज्वलजी निकम यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन हृदयस्पर्शी सत्कार करण्यात आला. वकिली क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय, निर्भीड व न्यायप्रवण कामगिरीचा यावेळी गौरव करण्यात आला.

      सत्काराला उत्तर देताना अॅड. उज्ज्वलजी निकम म्हणाले की, “मुळात मला डॉक्टर व्हायचे होते. मात्र तत्कालीन व्यवस्थेमध्ये वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश न मिळाल्यामुळे अनिच्छेने वकिली व्यवसाय स्वीकारावा लागला. परंतु आज मागे वळून पाहताना वकिली व्यवसायात येणे हीच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी संधी ठरली आहे.”


      ते पुढे म्हणाले की, “आजच्या काळात नव्या वकिलांसाठी न्यायालयीन कामकाजामध्ये विविध प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत. वकिली व्यवसाय हा केवळ उपजीविकेचे साधन नसून तो एक ‘नोबल प्रोफेशन’ असून समाजाला न्याय मिळवून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या माध्यमातून घडते.”


यावेळी त्यांनी बार असोसिएशनच्या सर्व सभासदांना व तरुण वकिलांना मनःपूर्वक शुभेच्छा देत न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ करण्याचे आवाहन केले.


      या कार्यक्रमास बार असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, ज्येष्ठ वकील तसेच मोठ्या संख्येने वकील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी अॅड. आर. बी. खंडेलवाल यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

أحدث أقدم