Top News

जिमखाना व ग्लोबल मॅनेजमेंट सोल्युशन्स आयोजित ' साऊंड ऑफ द न्यु एरा' मैफल रंगली

 जिमखाना व ग्लोबल मॅनेजमेंट सोल्युशन्स आयोजित ' साऊंड ऑफ द न्यु एरा' मैफल रंगली

जिमखाना व ग्लोबल मॅनेजमेंट सोल्युशन्स आयोजित ' साऊंड ऑफ द न्यु एरा' मैफल रंगली


नगर : दर्शक ।
 नगर जिमखाना क्लब व्यवस्थापन हस्तांतरण सोहळा नुकताच दिमाखदार आयोजित करण्यात आला होता. जिमखान्याचे मुख्य व्यवस्थापक अरविंद पारगांवकर व सर्व सन्मानित व्यवस्थापक यांच्या मुख्य उपस्थित व शुभ हस्ते ग्लोबल मॅनेजमेंट सोल्यूशनचे संकेत गांधी यांनी सूत्र हाती घेतले. भविष्यात सामाजिक, सांस्कृतिक व कौटुंबिक उपक्रमांचे एक विशेष केंद्र म्हणून नगर जिमखान्याकडे पाहिले जाईल असा विश्वास गांधी यांनी दर्शविला.


         नगर जिमखाना व ग्लोबल मॅनेजमेंटने या निमित्ताने भव्य *साऊंड आॅफ द न्यु एरा* ही आंतरराष्ट्रीय गायक पवन श्रीकांत नाईक यांची विशेष मैफल आयोजित केली होती. मैफलीला सभासदांसह पाचशे रसिकांनी विशेष हजेरी लावली. नाईक यांनी प्रसिद्ध हिंदी, पंजाबी व मराठी सिने गीतांमध्ये अलबेला सजन आयो, मितवा, किन्ना सोणा, झुले झुले लाल, तीर्थ विठ्ठल, अखीया उडिक दियाॅ व सासों की माला पे राम अशा विविध रचना सादर करून रसिकांची मने जिंकली.






         पवन नाईक यांना मैफलीत साथसंगतकार म्हणून कल्याण मुरकुटे (संवादिनी), स्मिता राणा (सतार), महेश लेले (व्हायोलिन), कुलदीप चव्हाण (बेंजो), नरेंद्र साळवे (सिंथेसायझर), सुरज शिंदे (तबला), आदित्य मोरे (ईलेंक्टाॅनिक ट्रम), सहगायनात श्रेयस शित्रे, पवन तळेकर, मूलांशु परदेशी, नवरतन वर्मा, संगीत ठाकूर, निनाद पारखी, विजय जाधव, ऋषी त्रिवेदी व आश्लेषा मोरे यांनी विशेष रंगत भरली. प्रसन्न पाठक यांनी माहितीपूर्ण सूत्रसंचालन केले.



         अद्यावत निवास व्यवस्था, भव्य पार्टी लाॅन, सभासदांसाठी कौटुंबिक व एम. आय. डी. सी. कंपनीच्या विशेष कार्यक्रमांसाठी विशेष लाॅन, लहान मुलांसाठी खेळ व खेळणी पटांगण, भव्य जलतरण तलाव, बलोपासना कक्ष, बिलीअर्डस्, टेबल टेनिस, संगीत विभाग, प्रशस्त भोजन कक्ष व सुसज्ज वाहन तळ ईथे सर्व सभासद व शहरवासीयांसाठी खुले आहे व नव्याने सभासदत्व स्विकारून या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन पारगांवकर यांनी केले.



         मैफलीला विश्वस्थांपैकी अविनाश बोपर्डीकर, अरुण कुलकर्णी, प्रवीण बजाज, परेश मांगलिक, श्रीहरी टिपुगुडे, प्रवीण जुंद्रे, बाळासाहेब विश्वासराव, किरण कथडे, धीरज गांधी, महेश चांडक, संतोष माणकेश्वर, चंद्रशेखर आरोळे, मिलिंद कुलकर्णी यांच्यासह सर्व जिमखाना सदस्य कुटूंब जिमखाना कर्मचारी तसेच व ग्लोबल मॅनेजमेंट चे कर्मचारी, रेस्टॉरंट चे मिलींद बेंडाळे आणि शहरातील इतर जाणकार रसिक आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

أحدث أقدم