Top News

अँड. सतीशचंद्र सुद्रिक यांना राष्ट्रीय साई जीवनगौरव समाजभूषण पुरस्कार

 अँड. सतीशचंद्र सुद्रिक यांना राष्ट्रीय साई जीवनगौरव समाजभूषण पुरस्कार

अँड. सतीशचंद्र सुद्रिक यांना राष्ट्रीय साई जीवनगौरव समाजभूषण पुरस्कार




नगर : दर्शक 
 नगर येथील ज्येष्ठ व प्रति­थयश फौजदारी वकील अ‍ॅड. सतीशचंद्र सुद्रिक यांना ओम साई विकास प्रतिष्ठानच्या वतीने राष्ट्रीय पातळीवरील साई जीवनगौरव समाजभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा सन्मान सोहळा शुक्रवार, दि. 10 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9.30 वाजता श्री साईंच्या पावन व पवित्र भूमीत शिर्डी येथे होणार आहे.


         अ‍ॅड. सुद्रिक यांनी गेल्या तब्बल 45 वर्षांपासून कायदे क्षेत्रात प्रामाणिकपणे व निष्ठेने कार्य करत न्यायव्यवस्थेत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. फौजदारी कायद्याच्या क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव, समाजाभिमुख भूमिका तसेच सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेले योगदान उल्लेखनीय ठरले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत ओम साई विकास प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे.


        या पुरस्काराची घोषणा होताच कायदे क्षेत्रातील सहकारी, सामाजिक संस्था, विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच नगर शहर व जिल्ह्यातील नागरिकांकडून अ‍ॅड. सतीशचंद्र सुद्रिक यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या कार्यामुळे नगरचे नाव राष्ट्रीय पातळीवर गौरविले जात असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

أحدث أقدم