Top News

Nagar Music | तबला वादन परीक्षेत ओंकार चौकटे प्रथम

 Nagar Music | तबला वादन परीक्षेत ओंकार चौकटे प्रथम






नगर : दर्शक  


अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळातर्फे नोव्हेंबर-डिसेंबर 2025 या कालावधीत घेण्यात आलेल्या सांगीतिक परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून शिवरंजन संगीतालयाचा विद्यार्थी ओंकार चौकटे याने तबला वादन (विशारद प्रथम) या परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.



     ओंकार चौकटे याच्या या यशामुळे नगर शहराच्या सांगीतिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शिवरंजन संगीतालयाच्या गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. ओंकारला या यशासाठी शिवरंजन संगीतालयाचे संचालक व तबला वादक सुरज शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. नियमित सराव, शास्त्रशुद्ध शिक्षण व गुरुंचे योग्य मार्गदर्शन यामुळेच हे यश मिळाल्याचे ओंकारने सांगितले.



     ओंकार चौकटे हा पेमराज सारडा कॉलेज, नगर येथील वाणिज्य शाखेच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी असून शिक्षणासोबतच संगीताची आवड जोपासत त्याने सातत्याने तबला वादनाचा अभ्यास केला. तो नगर शहरातील शिंदे मळा परिसरातील रहिवासी असून टेलर व्यवसायिक निलेश चौकटे यांचा मुलगा आहे.



     ओंकारच्या या यशाबद्दल त्याचे कुटुंबीय, गुरुजन, मित्रपरिवार तसेच संगीतप्रेमींनी त्याचे अभिनंदन केले आहे. भविष्यात तबला वादनाच्या क्षेत्रात आणखी उच्च पातळी गाठण्याचा मानस ओंकार चौकटे याने व्यक्त केला आहे.

Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

أحدث أقدم