Top News

Patrakar Din Nagar | प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल व पोर्टल सर्व माध्यमांची सांगड घालून सर्वानी सोबत पुढे जाणे गरजेचे : सुधीर लंके

मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने पत्रकार दिन उत्साहात साजरा 







नगर : दर्शक | 



पत्रकारांनी पत्रकारिता केवळ बातम्या देण्यापुरते मर्यादित न राहता, आपल्या अनुभवांचे व कार्याचे डॉक्युमेंटेशन करणे अत्यंत आवश्यक आहे. पूर्वीचा आणि व आजचा बदलता काळ, त्या-त्या काळात केलेली पत्रकारिता याचा अनुभव पुस्तकरूपाने समाजासमोर मांडावा. अशी पुस्तके नवोदित पत्रकारांसाठी मार्गदर्शक प्रेरणादायी ठरतील, प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल व पोर्टल आणि आजच्या जमान्यातील सर्व माध्यम यांची योग्य सांगड घालून सर्वानी सोबत पुढे जाणे गरजेचे आहे असे प्रतिपादन शासनाच्या अधिस्वीकृती नाशिक विभागाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार सुधीर लंके यांनी केले.



मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने शहरात मराठी पत्रकार दिन पत्रकारांचा सन्मान करून साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. याप्रसंगी मराठी पत्रकारितेचे जनक, दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.



शहरासह जिल्ह्याला पत्रकारितेचा मोठा वारसा लाभलेला असून, सातत्याने विविध सामाजिक, राजकीय व प्रशासकीय घडामोडी येथे घडत असतात. लोकशाहीचे रक्षण करणारा पत्रकारच खरा पत्रकार असतो, शासनाच्या अधिस्वीकृतीसाठी असलेली नियमावली, त्याचे फायदे व त्याचा लाभ कसा घ्यावा, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख म्हणाले की, पत्रकारांनी १५० वर्षांपूर्वीचे विषय आणि आजचे विषय यांची सांगड घालून पुढे जाण्याची गरज आहे.




पत्रकारितेचा समृद्ध वारसा पुढील पिढीकडे सोपवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. सध्या तरुण पिढी या क्षेत्रात अपेक्षेप्रमाणे येताना दिसत नाही. जे नवीन पत्रकार येत आहेत, त्यांना योग्य प्रशिक्षण देणे आवश्यक असून, यासाठी कार्यशाळा घेणे गरजेचे आहे. 




निवृत्तीच्या वाटेवर असलेले अनुभवी पत्रकार नवोदितांसाठी योगदान देण्यास तयार आहेत. पत्रकारितेमध्ये डॉक्युमेंटेशनचे महत्त्व अधोरेखित करत, संघटनांनी पुढाकार घेऊन हे काम करावे, असे त्यांनी सांगितले. तसेच बाळशास्त्री जांभेकर यांच्या पत्रकारितेतील योगदानावरही त्यांनी प्रकाश टाकला.




कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख, शासनाच्या अधिस्वीकृती नाशिक विभागाचे सदस्य विजयसिंह होलम, मराठी पत्रकार परिषदेचे राज्य कोषाध्यक्ष मन्सूर शेख, रामदास ढमाले, महेश महाराज देशपांडे, सुदाम देशमुख, शिरीष कुलकर्णी, प्रकाश कुलकर्णी, रमेश देशपांडे, दिलीप वाघमारे, राजकुमार कटारिया, सुभाष चिंधे, बंडू पवार, सचिन शिंदे, डिजिटल मीडिया परिषदेचे जिल्हाध्यक्ष आफताब शेख, राजू खरपुडे, वाजिद शेख, साजिद शेख, बाबा ढाकणे, संजय सावंत, अन्सर सय्यद, गुलामकादर जहागीरदार, संजय पाठक, राजेंद्र येंडे, सुधीर पवार, जहीर सय्यद, निसार मास्टर, आदिल रियाज शेख,रमीज शेख, नवीद शेख आदींसह पत्रकार, वृत्तछायाचित्रकार व विविध माध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

أحدث أقدم