Top News

Sindhi Samaj | भारतीय सिंधू सभेच्या वतीने शहीद हेमू कलानी यांना श्रद्धांजली

 Sindhi Samaj | भारतीय सिंधू सभेच्या वतीने शहीद हेमू कलानी यांना श्रद्धांजली



नगर : दर्शक ।

 भारतीय सिंधू सभा, अहिल्यानगर शाखेच्या वतीने सिंधी समाजाचे युवा सपूत शहीद हेमू कलानी यांच्या 83 व्या पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सिंधी कॉलनी येथील संत कंवरराम चौकातील पुतळ्याजवळ आयोजित कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून शहीद हेमू कलानी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.





      यावेळी भारतीय सिंधू सभेचे अहिल्यानगर शाखेचे विद्यमान चेअरमन मोती आहूजा, भारतीय सिंधू सभेचे प्रदेश उपाध्यक्ष दामोदर बठेजा, भारतीय सिंधू सभेचे माजी चेअरमन रमेश कुकरेजा तसेच भारतीय सिंधू सभेचे सदस्य द्वारका किंगर, किशन पंजवानी, सागर बठेजा, मुकेश आसनानी, अशोक सचदेव, प्रेम बजाज, जयकुमार रंगलानी, ओम कुकरेजा, जयकुमार खूबचंदाणी, उत्तम छुटानी, जियंद रोहिडा, मूलचंद तलरेजा, मनोहर खूबचंदाणी, कुमार आसिजा व मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.




       याप्रसंगी हेमू कलानी विषयी माहिती देताना प्रा. चंदर थदानी यांनी सांगितले की, हेमू कलानी हे सिंध प्रांतातील एक धाडसी क्रांतिकारक होते. त्यांनी वयाच्या 19 व्या वर्षी 1942 च्या छोडो भारत आंदोलनात ब्रिटिशांविरुद्ध लढताना 21 जानेवारी 1943 रोजी फाशी स्वीकारली. त्यांना 'सिंधूचा भगतसिंग' म्हटले जाते, कारण भगतसिंग यांच्या विचारांनी प्रेरित होऊन तरुणपणीच स्वराज्य सेनेत सामील होऊन स्वातंत्र्य संग्रामात सहभागी झाले.



 त्यादरम्यान त्यांना प्राप्त माहितीवरून इंग्रजांचा रेल्वेने येणारा दारुगोळा अडवण्याच्या प्रयत्नात पकडले गेले आणि त्यांना फाशी देण्यात आली. ते तरुण वयातच देशासाठी शहीद झाले, म्हणूनच त्यांचे जीवन देशभक्ती, धैर्य आणि त्यागाचे प्रतीक होते. त्यांच्या जीवनातून आजच्या पिढीला राष्ट्रनिर्मितीसाठी प्रेरणा मिळत राहील, असे शेवटी म्हणाले.
   कार्यक्रमाचे प्रास्ताविक जितेश सचदेव यांनी केले व उपस्थितांचे आभार मानले.

Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

أحدث أقدم