Top News

मी नाराज नाही ; आमदारकी सुद्धा काम करण्यासाठी पुरेशी - दीपक केसरकर

मी नाराज नाही ; आमदारकी सुद्धा काम करण्यासाठी पुरेशी - दीपक केसरकर

मी नाराज नाही ; आमदारकी सुद्धा काम करण्यासाठी पुरेशी - दीपक केसरकर






 दीपक केसरकर यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले मात्र दीपक केसरकरांनी संयमी भूमिका घेतली. त्यामुळे दीपक केसरकर यांनी ज्या प्रकारे संयमी भूमिका घेतली त्याचं एकनाथ शिंदे यांनी कौतुक केलं तर,नाराज आमदारांची समजूत काढण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या गोटोतून सुरू असून मीडियाच्या माध्यमातून नाराजीला वाचा फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर मात्र शिंदे नाराज झाल्याचं कळतंय.



 अशातच माजी मंत्री दीपक केसरकर यांनी या विषयावर भाष्य करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. मी नाराज नाही. अडीच वर्ष मला मंत्रिपद मिळालं, मी त्यात खुश आहे. आमदारकी सुद्धा काम करण्यासाठी पुरेशी आहे. शेवटी इतराणासुद्धा संधी मिळायला हवी. वय वाढत असतं. आगामी काळात कुणीतरी बाजूला व्हा म्हण्यापेक्षा आपण आधीच बाजूला झालेल चांगल असतं, अशी बोलकी प्रतिक्रिया ही  त्यांनी यावेळी दिली आहे.



माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला कुठे नाराजी दिसत आहे का?  नव्या मंत्र्यांच्या चेहऱ्यावरील आनंद बघा.  पहिल्या शुभेच्छा नितेश राणेंना दिल्या. ते तरुण आहेत, ते चांगलं काम करतील, माझं मार्गदर्शन त्यांना राहिलच. नाराजी असलेल्यांनी संयम ठेवला पाहिजे. गोगावले यांच्याकडे बघा, अडीच वर्ष त्यांनी वाट पाहिली.  



भुजबळ साहेब प्रदेशाध्यक्ष होते, ते बाहेर आहेत तर कोणीही बाहेर राहू शकतं. भुजबळ यांनी नाराजी दाखवली का? मुनगंटीवार यांनी नाराजी दाखवली आहे का? आम्ही उन्हाळे पावसाळे बघितले आहेत. आपण आनंदी राहिले पाहिजे त्यांच्या बरोबर राहिलं पाहिजे. असेही दीपक केसरकर  म्हणाले.


Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

أحدث أقدم